Rohit Pawar on Delhi Assembly Election Results 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi  Assembly Election) भाजपचा (BJP) मोठा विजय झाला आहे. आम आदमी पार्टीला (AAP) मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. 70 जागांपैकी जवळपास 48 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर आपला 22 जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला एकही जागा जिंकता आली आहे. दरम्यान, याच दिल्ली विधानसभा निवडणुकीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली विधानसभेचा निकाल हा धक्कादायक असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मनीष सिसोदिया यांनी डोंगराएवढं काम केलं आहे, तरीही त्यांचा पराभव झाला आहे असं म्हणत रोहित पवारांनी खंत व्यक्त केली आहे.


नेमकं काय म्हणाले रोहित पवार?


दिल्ली विधानसभेचा निकाल हा धक्कादायक आहे. आम आदमी पक्षाने आणि विशेषतः मनीष सिसोदिया साहेब यांच्यासारख्या निरलस व्यक्तीमत्त्वाने सामान्य माणसासाठी शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात देशात कुठंही झालं नाही असं डोंगराएवढं काम दिल्लीत उभं केलं आहे. तरीही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागत असेल तर निवडणुकीच्या राजकारणातून विकास हद्दपारच होईल आणि नेतेही विकासकामं करणं सोडून केवळ द्वेषाचंच राजकारण आणि इव्हेंटबाजीच करतील की काय, याची भीती वाटते. या निकालाने विकास करावा की नाही, असा प्रश्न पडला तर तो चुकीचा ठरणार नाही! एकीकडं विकास तर दुसऱ्या बाजूला सत्ता, संपत्ती आणि गुंडगिरी, या पर्यायात विकासाचा पराभव झाला आहे. यामुळं सामान्य माणसालाच अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे, याचं अधिक दुःख वाटतं असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. 


 






 जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करतील ही अपेक्षा


असो! गेली दहा वर्षे मुख्यमंत्र्यांना अनेक अडथळ्याची शर्यत पार करावी लागली, पण आता किमान मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल हे पायात पाय न घालता हातात हात घालून काम करतील आणि जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करतील, ही अपेक्षा असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे.


केजरीवालांसह मनिष सिसोदियांचाही पराभव


दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आम आदमी पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भाजपचे परवेश प्रवेश वर्मा (Parvesh Varma) यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर मात केली. अरविंद केजरीवाल यांचा जवळपास 1200 मतांनी पराभव झाला. याआधीच आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही पराभव झाला. याशिवाय दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी या सुद्धा पराभवाच्या छायेत आहेत.


महत्वाच्या बातम्या:


Delhi Election Result 2025: दिल्लीत 'आप'चा गड ढासळला, तर काँग्रेसचा सुपडासाफ; भाजपची मोठी खेळी, अवघे 100 तास ठरले निर्णायक