मुंबई : संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटाने (Corona Virus) पछाडलं असताना हळूहळू सर्वजण सावरत आहेत. त्यातच आता ओमायक्रॉन (Omicron) या नव्या विषाणूमुळे पुन्हा सगळ्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे आता सतर्कतेचा इशारा म्हणून शासन नवी नियमावली करत असून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या (Pune District) सूचनेनुसार पुण्यातही नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाताळ (Christmas 2021) सणाच्या सेलिब्रेशनसाठी आधीपासून राज्य सरकारनं नियमावली घोषित केली होती. त्यानंतर आता पुण्यातही नियमावली जाहीर झाली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी ही नियमावली जाहीर केली आहे.




ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात लागू करण्यात आलेले नियम



  • विवाह समारंभ बंद जागेमध्ये आयोजित करण्यासाठी 100 जणांची मर्यादा

  • मोकळ्या जागेत विवाहसमारंभ करण्यासाठी जास्तीत जास्त 250 आणि त्या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के उपस्थितीची मर्यादा

  • सामाजिक राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी बंद जागेत 100 जणांना परवानगी, तर मोकळ्या जागेत जास्तीत जास्त 250 जणांना परवानगी

  • क्रीडा स्पर्धा आणि विविध सामन्यांचे आयोजन करताना प्रेक्षक क्षमतेच्या 25 टक्के उपस्थितीची मर्यादा पाळण्यात यावी

  • रेस्टॉरंट, फिल्म, सिनेमा आणि नाट्यगृहांसाठी 50 टक्के उपस्थितीची परवानगी

  • सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक व्यक्तींना रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत एकत्र येण्यास परवानगी नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha