Special train for Goa to Panvel : नाताळ (Christmas 2021) आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी (New Year 2022) कोकण अथवा गोव्यात जाण्याचे नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. रेल्वेने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी काही खास ट्रेन चालवणार असल्याची घोषणा केली आहे. या खास ट्रेन 3 जानेवारीपर्यंत चालवण्यात येणार आहे. या स्पेशल ट्रेनचे बुकिंग IRCTC चे संकेतस्थळ अथवा रेल्वे आरक्षण केंद्रावरून करता येऊ शकते.
मध्य रेल्वेच्यावतीने या स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहे. या स्पेशल ट्रेनसाठीचे आरक्षण सुरू करण्यात सुरू करण्यात आले आहे. शनिवार, 20 नोव्हेंबरपासून प्रवाशी या स्पेशल ट्रेनसाठी आरक्षण करू शकतात.
01596 मडगाव जंक्शन-पनवेल स्पेशल ट्रेन मडगाव स्थानकाहून 21 नोव्हेंबर ते 2 जानेवारीपर्यंत चालवण्यात येणार आहे. ही ट्रेन प्रत्येक रविवारी धावणार आहे. मडगावहून ही ट्रेन सायंकाळी 4 वाजता सुटणार असून पुढील दिवशी पनवेल येथे पहाटे 3.15 वाजता पोहोचणार आहे.
01595 पनवेल-मडगाव जंक्शन स्पेशल ट्रेन 22 नोव्हेंबर 2021 पासून 3 जानेवारी 2022 पर्यंत चालवण्यात येणार आहे. ही ट्रेन दर सोमवारी धावणार आहे. पनवेलहून सकाळी 6.05 वाजता ही ट्रेन प्रस्थान करणार असून त्याच दिवशी सायंकाळी 6.45 वाजता मडगाव येथे पोहोचणार आहे.
या स्थानकांवर थांबणार
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही स्पेशल ट्रेन करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदूर्ग, कंकावली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, अडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डे, चिपळूण, खेड, माणगाव आणि रोहा स्थानकांवर थांबणार आहे.
या स्पेशल ट्रेनच्या अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. अथवा NTES App द्वारेही माहिती उपलब्ध होऊ शकेल.
कोविड मार्गदर्शक सुचनांचे पालन
रेल्वे प्रवासा दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोरोना मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे लागणार आहे. प्रवाशांना सोशल डिस्टेंसिग व इतर नियमांचे पालन करावे लागणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
रेल्वेमध्ये कोरोना काळात बंद झालेली 'ही' सुविधा पुन्हा सुरू होणार
वाहन चालकांना नव्हे तर तळीरामांना दिलासा; परदेशी स्कॉच स्वस्त होणार