Pune Crime news : शहरातील (Pune Crime News)अनेक मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी एका 44 वर्षीय व्यक्तीला चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. आजारी असल्याचं सांगून मुलींना लिफ्ट मागायचा आणि बळजबरीने गाडीवर मुलींचा विनयभंग करत होता. या प्रकरणी काही मुलींना पोलिसांनी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधला आणि पोलिसांनी त्याला जेरबंद केलं.
अनुप प्रकाश वाणी असं त्या आरोपीचं नाव आहे. रस्त्यावर बिनधास्तपणे मुलींवर बळजबरी करायची आणि त्याच्या स्कूटीवर बसून तो त्यांचा विनयभंग करायचा. 11 जुलै रोजी त्यांच्या एका पीडितेने महिलांच्या मदतीसाठी दिलेल्या टोल-फ्री नंबरद्वारे तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी वाणीचा ठावठिकाणा शोधून त्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जुलै रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पीडित महिला सेनापती बापट रोड येथील बालभारती इमारतीजवळ तिच्या मैत्रिणीसोबत असताना वाणी त्याच्या स्कूटीवर आला आणि त्यांच्यासमोर थांबला. त्याने त्यांना चक्कर येत असल्याचे सांगितले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात सोडण्यास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून पीडितेने मदत करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मध्येच आरोपीने तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्यास सुरुवात केली. पीडितेने काही लोक उभे असलेल्या ठिकाणी वाहन थांबवून मदतीसाठी आरडाओरड केली. आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी अविवाहित असल्याचे समोर आले असून नैराश्यात त्याने हे सर्व कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीच्या बोलण्यावर माझा विश्वास होता आणि मी त्याला वैद्यकीय मदतीसाठी सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र,मी त्याच्या दुचाकीवर बसताच त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. मी वाहन थांबवले आणि त्याला रस्त्यात सोडले, असंही पिडितेने सांगितलं आहे.
दुसरी मुलगी शिवाजी नगरची रहिवासी आहे. ती वाणीला भेटली. ती म्हणाली की, मी कोथरूडजवळील एका बँकमध्ये काम करते. 3 जुलै रोजी एका अज्ञात व्यक्तीने मॉडर्न कॉलेजजवळ माझ्याकडे येऊन मदत मागितली. जेव्हा मी त्याला माझ्या वाहनावर बसण्यास सांगितले तेव्हा त्याने नकार दिला आणि मला त्याऐवजी त्याची स्कूटी चालवण्याची विनंती केली. पण मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि ते ठिकाण सोडले. नाहीतर त्यांने माझाही विनयभंग केला असता.
यासंदर्भात पुणे पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, गुन्हेगारांनो आता सगळी माहिती whatsapp वर मिळत आहे. त्यामुळे सावध रहा. आम्ही नागरिकांना व्यासपीठ दिलं आहे. त्यांच्या तक्रारी पाहून तातडीने कारवाई होणार आहे.
हेही वाचा-
Pune Crime News : दारु पितो म्हणून पत्नीनेच पतीला संपवलं अन् नंतर जे केलं ते...; पुण्यातील घटना