Pune news : भात लागवड करताना पाहणं आणि (Pune news) प्रत्यक्षात लागवड करणं यात जमीन-आस्मानचा फरक आहे. हाच फरक प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी शालेय गणवेशातील विद्यार्थी थेट भात खाचरात उतरले. विध्यार्थ्यांना पुस्तकातून लागवड अभ्यासली होतीच, मात्र प्रात्यक्षिकातून लागवडीचा हा धडा मिळाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान होतं. सध्या सगळीकडेच पुस्तकी ज्ञान दिलं जातं त्यामुळे मुलांना बाहेरच्या जगाची माहिती फार कमी प्रमाणात शाळकरी मुलांना दिली जाते. त्यात शेती किंवा पर्यावरणासारखे विषय हे निसर्गाच्या सानिध्यात जाऊनच शिकले तर उत्तम कळतात त्यामुळे ही सगळी मुलं निसर्गाच्या कुशीत वसलेल्या शाळेत उतरले आहेत.
पुण्याच्या मावळ तालुक्यातील येवलेवाडी शाळेच्या विध्यार्थ्यांना भात लागवडीचा हा आनंद घेता आला. रोजच्या जेवणात ताटात येणारा भात नेमका कसा पिकतो अन त्यासाठी भात शेतकऱ्यांना किती काबाड कष्ट घ्यावे लागतात, हा धडा प्रत्यक्षात विध्यार्थ्यांना घेता यावा. यासाठी शिक्षकांनी अशी शक्कल लढवली होती.
मुलांना अनेकदा अनेक गोष्टी पुस्तकात शिकून कळत नाही. ज्या गोष्टी पुस्तकातून शिकता येतात त्या शिकवाव्यात मात्र ज्या गोष्टी प्रात्यक्षिक करुनच शिकवायला हव्या त्या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना बंद खोल्यांच्या शाळेच्या बाहेर काढणं गरजेचं असतं. या बंद खोल्यांच्या बाहेरच्या शाळेत मुलांना वेगवेगळे धडे दिले पाहिजेत. शेतकरी, बळीराजा कसा राबतो, हे मुलांना कळलं पाहिजे आणि आपल्या घरात भात कसा येतो, हेदेखील मुलांना कळलं पाहिजे, यासाठी मुलांना थेट भात खाचरात घेऊन आल्याचं शिक्षक सांगतात.
रोज शाळेत जाऊन तोच तोच अभ्यास करुन विद्यार्थी कंटाळतात. विद्यार्थ्यांनाही काहीतरी नवीन हवंच असतं. त्याच जर विद्यार्थ्यांना निसर्गाचं शिक्षण दिलं तर विद्यार्थीदेखील रमतात. अनेक गोष्टी अंगवळणी पाडून घेण्याचं हेच वय असतं. शाळेतील शिक्षण विद्यार्थ्यांना जगाशी लढण्याची ताकद देतं. त्यामुळेच त्यांची एक सहल म्हणून शेतात किंवा बाहेर फिरायला घेऊन जात असतो, असे देखील शिक्षकांनी सांगितलं.
विद्यार्थी रमले चिखलात-
शिक्षकांची ही शक्कल पाहून काही विद्यार्थीही आनंदी झाले. तोच अभ्यास आणि तीच शाळा करुन विद्यार्थी कंटाळतात. त्यामुळे चिखलात उतरुन विद्यार्थ्यांनी भात लावणीचा आनंद घेतला आणि निसर्गाच्या शाळेत रमले.
हेही वाचा-