पुणे : देशासह राज्यात सध्या सर्वत्र नवरात्रीचं मंगलमय वातावारण आहे. सर्वत्र गरबा खेळण्याची धूम आहे. मात्र, याच आनंदाच्या वातावरणात एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पुण्यात चाकण येथे गरबा खेळताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. पुण्यात प्रसिद्ध गरबा किंग म्हणून प्रसिद्ध असलेले कलाकार अशोक माळी यांचा चाकण येथे गरबा खेळताना मृत्यू झाला आहे. लेकासोबत गरबा खेळताना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. अपस्थितांनी त्याला तात्काळ उचलून रुग्णालयात नेलं. मात्र, तोपर्यंत सारं संपलेलं होतं. डॉक्टरांनी या तरुणाला तपासून मृत घोषित केले.
संबंधित घटनेचा व्हिडीओ मनाला चटका लावणारा आहे. या व्हिडीओमध्ये अशोक माळी घुंगट मे चाँद होगा आखो मे सजनी... या गाण्यावर आनंदाने आपल्या लेकासोबत गरबा खेळत होते. गरबा खेळताना अचानक ते जमिनीवर कोसळले. जमीनीवर कोसळले त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आलं. अशोक माळी हे मूळचे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील होळ गावाचे रहिवासी आहेत. अशोक माळी यांचा गरबा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असे.
लेकासमोरच कोसळले, मन हेलवणारा व्हिडीओ
अशोक माळी हे गेल्या चार- पाच वर्षापासून गरबा प्रशिक्षक म्हणून काम करतात. नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या मंडळांकडून त्यांना आमंत्रण असते. यंदा देखील चाकणमधील एका ठिकाणी गरबा खेळण्यासाठी गेले होते.अशोक माळी यांच्यासोबत त्यांचा मुलगा भावेश देखील गेला होता. दोघे गरबा खेळताना त्यांचा मृत्यू झाला आहे.
हार्ट अटॅकमागे ही कारणे
दरम्यान, गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू कसा काय येऊ शकतो? यामागे मोठे कारण काय आहे? याबाबत आरोग्य तज्ज्ञ समीर भाटी सांगतात की, हृदयविकाराच्या झटक्यामागे अनेक प्रमुख कारणे असू शकतात. त्यांनी सांगितले की निदान हृदयाशी संबंधित कोणतेही कारण असू शकते, मेटाबॉलिक सिंड्रोम ज्यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, तणाव, आहार इ. एक कारण म्हणजे आपल्या शिरा पातळ आहेत, ज्यामुळे पाश्चिमात्य लोकांपेक्षा 10 वर्षांपूर्वी भारतीयांना हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता वाढते. प्रदूषण आणि बदलती जीवनेशैली हे देखील धोक्याचे घटक असू शकतात.
पाहा Video :
हे ही वाचा :
Navratri 2024 Fashion: गरबा नाईटला दिसाल परफेक्ट अन् सुंदर! 'या' ट्रेंडी हेअर स्टाईलने लागतील चार-चांद, नवरात्रीत सर्वांच्या खिळतील नजरा