पुणे : पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि कोट्यावधी (ganeshotsav 2023)  रुपयांचा खर्च करुन साजरा केला जातो. मात्र याच गणेशोत्सवातून अनेकांना रोजगार मिळतो तर अनेकजण सामाजिक कार्य करतानादेखील दिसतात. पिंपरी-चिंचवडच्या श्री शंकर महाराज सेवा मंडळतर्फे ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ या उपक्रमाअंतर्गत वयस्करांसाठी निशुल्क वृद्धाश्रम चालवलं जातं. या मूर्ती विक्रीतून मिळालेला निधी हा वृद्धाश्रमासाठी वापरला जातो.  


श्री शंकर महाराज सेवा मंडळ, चिंचवड ही धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत संस्था आहे. रक्तदान शिबिरांपासून संस्थेची सुरुवात झाली आहे. गेल्या 30 वर्षांपासून वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम संस्थेद्वारे राबविले जातात आणि त्यापैकीच एक महत्वपूर्ण प्रकल्प म्हणजे संस्थेकडून किवळे येथे ‘स्नेहसवली – आपलं घर’ हे निशुल्क वृद्धाश्रम चालवलं जातं.  संस्था 25 निराधार आजीआजोबांचा सांभाळ करत आहे. त्यांचा निवास, भोजन, कपडे, इतर संबंधी गरजा तसेच महत्वाचे म्हणजे आवश्यक मोफत वैद्यकीय सेवेची जबाबदारी संस्था घेत आहे.


सांभाळ करत असणाऱ्या वृद्धांचे वयोमानानुसार अंगी लागणारे आजार, वैद्यकीय तपास आणि गरजेप्रमाणे बायपास सर्जरी, कॅटरॅक्ट ऑपरेशन, हिप रिपलेसमेंट सारखे अवघड आणि खर्चिक शस्त्रक्रियेची जबाबदारी देखील निशुल्क उचलली जाते. हा सर्व डोलारा चलविण्यासाठी येणारा खर्च हा साधारण दोन लाख रुपये प्रति महिना आहे आणि तो उभा करण्यासाठी संस्था अनेक उपक्रम राबवते आणि त्यातून मिळणारे दान आणि होणारी आर्थिक मदतीतून वृद्धाश्रमाचा सर्व खर्च भागवला जातो. 


रद्दी आणि भंगार गोळाकरुन मिळालेल्या पैशातून वृद्धाश्रमाचा खर्च


या मध्ये संस्थेकडून रद्दी आणि भंगार गोळा करण्याचा उपक्रम राबविला जातो ज्या अंतर्गत संस्थेद्वारे घरोघरची रद्दी आणि भंगार गोळा करून निधी निर्माण केला जातो आणि याकरता साधारण सतरा हजार कुटुंब दानस्वरूपी मदत संस्थेला वर्षभर करतात. याबरोबरीने संस्थेकडून अभिनव संकल्पनेने दरवर्षी नियमितपणे ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ हा उपयुक्त प्रकल्प राबविला जातो.


अनेक वृद्धांना हातभार


दरवर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक या उपक्रमात सहभागी होत असतात. अनेक लोक वृद्धांची सेवा आणि आशीर्वाद मिळतो आणि वृद्धाश्रमाला हातभार लावता येतो, या भावनेने या उपक्रमात सहभागी होत असतात आणि या उपक्रमातून अनेक वृद्धांना हातभार लावत असतात. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Ganeshotsav News : पुण्यातील गणेशोत्सवात रंगणार राजकीय आखाडा, देखाव्यासाठी मोदी, फडणवीस अन् अनेक नेत्यांच्या हुबेहुब प्रतिकृती