Pune Ganeshotsav 2022:  गणेशोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला असं मानलं जातं. त्यामुळे दरवर्षी हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 31 ऑगस्ट 2022 ते 9 सप्टेंबर 2022 पर्यंत गणेशोत्सव सादरा केला जाणार आहे. गणपती उत्सव देशाच्या अनेक भागात आनंदाने आणि जल्लोषात साजरा केला जाणार आहे. या वेळी ते गणपती बाप्पा मोरया या नावाचा जयघोषही पूर्ण उत्साहाने होणार आहे. लहानांपासून मोठ्यांंपर्यंत या 10 दिवसा सगळ्यांच्या तोंडी एकच जयघोष असतो. तो म्हणजे गणपती बाप्पा मोरया. मात्र गणपती बाप्पा मोरया ही घोषणा सगळ्यात आधी नेमकी कोणी दिली. त्यामागची रंजक कथा नेमकी काय होती? हे समजून घेऊया. 


...म्हणून मोरया यांच्या नावाने केला जातो जयघोष
गणपती बाप्पा मोरया या जयघोषाची कथा 14 व्या शतकातील गणपती भक्त मोरया गोसावी यांच्याशी संबंधित आहे. सर्वप्रथम गणेश चतुर्थी किंवा गणेशोत्सवाची परंपरा कशी सुरू झाली हे आपल्याला माहीत आहे. गणेशोत्सवाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आणि त्याची सुरुवात सर्वप्रथम लोकमान्य टिळकांनी केली. महाराष्ट्रानंतर हा सण हळूहळू देशभर साजरा होऊ लागला. महाराष्ट्रात पित्याला बाप्पा म्हणतात. भाविकांनी गणपतीला आपला बाप मानून त्याची पुजा करण्यास सुरुवात केली. मोरया गोसावी हे गणेशाचे परम भक्त होते, असे म्हणतात. त्यामुळेच त्यांच्या नावाने बांधलेले मोरया गोसावी समाधी मंदिर आज लोकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. पुण्यापासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवडमध्ये असलेल्या या मंदिराची स्थापना स्वतः मोरया गोसावी यांनी केली होती. मोरया गोसावी यांचा जन्म 1375 मध्ये झाला होता.


 


काय होती रंजक कथा?
मोरया लहानपणापासूनच गणेशभक्त होते. लहानपणापासून मोरया गोसावी दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी चिंचवड ते मयूरेश्वर मंदिरापर्यंत 95 किलोमीटर पायी चालत गणेशाच्या दर्शनासाठी जात असत, असं म्हणतात. मात्र काही वर्षांनी वृद्धापकाळामुळे मोरया गोसावी यांना पायी गणपती मंदिरात जाता आले नाही. मग एके दिवशी गणेश त्याच्या स्वप्नात आला आणि म्हणाला उद्या तू अंघोळ करून तलावातून बाहेर येशील तेव्हा तू मला तुझ्यासमोर बघशील. भक्त मोरयाचे स्वप्न साकार झाले. स्नान करून मोरया बाहेर आल. स्वप्नात बघितली तशी गणेशाची मुर्ती त्याच्यासमोर होती. मोरयाने ती मुर्ती चिंचवडमध्ये बसवली. हळुहळु या मंदिराची लोकप्रियता वाढत गेली आणि आज चिंचवडमध्ये असलेल्या या मंदिरात दूरदूरहून लोक दर्शनासाठी येतात. लोक या मंदिरात केवळ गणपतीच्या दर्शनासाठीच नव्हे तर त्यांचे महान भक्त मोरया गोसावी यांच्या दर्शनासाठीही येतात आणि आशीर्वाद घेतात. त्यामुळे मोरया यांच्या भक्तीमुळे गणपतीसोबत मोरया असा जयघोष केला जातो.