Pune Fire : पिंपरी चिंचवडच्या कुदळवादीत गोडाऊनला आग लागलीये. भंगाराच्या साहित्याला लागलेल्या आगीने धुराचे लोट निर्माण झालेत. आजूबाजूचचे गोडाऊन ही आगीच्या जाळ्यात अडकली आहेत. काहीवेळा पूर्वी ही आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाची वाहन घटनास्थळी पोहचलेली आहेत. आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुदैवाची बाब म्हणजे कोणतीही जिवीतहानी झाल्याची माहिती नाही.


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य अग्निशमन केंद्रास सकाळी 10:19 वाजता इंद्रायणी चौकाजवळ कुदळवाडी चिखली या ठिकाणी भंगार दुकानाला आग लागल्याची वर्दी प्राप्त होताच पिंपरी चिंचवड महानगरपालिका तळवडे,चिखली मोशी ,प्राधिकरण ,भोसरी ,पिंपरी ,थेरगाव व रहाटणी या सर्व अग्निशमन केंद्रातील अग्निशमन पथकांना घटनास्थळी त्वरित रवाना करण्यात आले. घटनास्थळी अंदाजे तीन एकर परिसरामध्ये वीस ते पंचवीस भंगार दुकानांना आग लागल्याने मोठ्या प्रमाणात आग व अवकाशामध्ये धुराचे लोट दिसून येत होते. घटनास्थळी जळणारी दुकाने यामध्ये फोंमरबर, प्लास्टिक मटेरियल , प्लास्टिक बनवण्यासाठी वापरले जाणारे कच्चा माल, टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर यांचे भंगार मटेरियल, पॉलिथिन बॅग, ऑइल कॅन ड्रम, या सर्व जळाऊ मटेरियल चा भंगार दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात साठा असल्याने तसेच अरुंद रस्ते पत्रा शेडचे बांधकाम यामुळे अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी मोठ्या शर्तीने प्रयत्न करावे लागले. पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलास आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निरंतर पाण्याचा मारा करून 70 ते 75 गाडी पाणी मारून आग शमविण्यात यश आले. जळावू सामग्री असल्याने घटनास्थळी आगीचे लोट कमी झाले असून आगीला थंड करण्याचे काम अजूनही चालू आहे.


पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन दलाच्या मदतीस पुणे महानगरपालिका अग्निशमन दल, पी एम आर डी ए अग्निशमन दल, टाटा मोटार कंपनी अग्निशमन दल, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ अग्निशमन दल, चाकण एमआयडीसी अग्निशमन दल ,हिंजवडी अग्निशमन दल, इत्यादी अग्निशमन केंद्रांनी सहभाग नोंदविला.आगीचे कारण समजू शकले नाही.


आगीमध्ये कोणतेही जीवित हानी झाली नाही. घटनास्थळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्री प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्त श्री मनोज लोणकर ,अग्निशमन अधिकारी श्री ऋषिकांत चिपाडे, श्री दिलीप गायकवाड ,बाळासाहेब वैद्य यांचे समवेत 96 कर्मचारी वर्गाने आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


MLA Yogesh Tilekar Mama : आमदार योगेश टिळेकर यांच्या अपहरण झालेल्या मामाची हत्या झाल्याचे समोर, मृतदेहाबाबत मोठी अपडेट