Pune News कामशेत: मावळातील तरुणांनी महायुती सरकारच्या स्थापनेचे अनोख्या पद्धतीने स्वागत करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 9 डिसेंबर रोजी विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, 11 पॅराग्लायडर्सनी 700 फूट उंचीवरून महायुती सरकारच्या अभिनंदनाचे बॅनर झळकवले. या आगळ्या उपक्रमामुळे मावळ तालुक्याच्या भूमीत एक नवा उत्साह संचारला असल्याचे बघयाला मिळाले आहे.


‘आमचं ठरलंय’ बॅनरचे आकर्षण


पॅराग्लायडिंगद्वारे हवेत झळकलेल्या बॅनर्समध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह संभाव्य मंत्र्यांचे फोटो झळकले आहेत. “आमचं ठरलंय” असा संदेश देणारे हे बॅनर मावळातील जनतेचा सरकारप्रती असलेला विश्वास आणि अपेक्षांचे प्रतीक ठरले, असल्याचे सांगण्यात येतंय. 


मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या सहकाऱ्यांकडून राबवण्यात आलेल्या या अभिनव संकल्पनेने महायुतीच्या सरकारला तरुणाईची कल्पकता दाखवून दिली आहे. पॅराग्लायडिंगद्वारे अभिनंदन करण्याची ही कल्पना राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे.


मावळ पॅराग्लायडिंग असोसिएशनचे अध्यक्ष रमेश भुरुक आणि त्यांच्या टीमने या अनोख्या उपक्रमाची धुरा सांभाळली. या उपक्रमात पंकज गुगळे, प्रवीण शिंदे, भाऊ गायकवाड, बाळासाहेब कुडले, गणेश शिंदे, गणपत नेवाळे, विकास शेलार, सनी कोळेकर, योगेंद्र भुल, दत्ता कोंढरे यांसारख्या तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.


महायुती सरकारचा नवा अध्याय


महायुती सरकारच्या स्थापनेनंतर राज्यात विकासाच्या नव्या पर्वाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मावळातील तरुणांनी दाखवलेला उत्साह आणि समर्थन ही महायुतीच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाची साक्ष आहे. या अनोख्या पद्धतीने दिल्या गेलेल्या शुभेच्छांनी मावळ तालुक्याला राज्यभर प्रसिद्धी मिळवून दिली आहे.


या उपक्रमाने राजकारणातील पारंपरिक अभिनंदनाच्या पलीकडे जाऊन तरुणाईच्या सर्जनशील दृष्टिकोनाची झलक दाखवली आहे.तसेच मावळ तालुक्यातील नागरिक आमदार शेळके यांच्या रुपाने मंत्रीपदाची वाट पाहत असून मावळ तालुका हा विकासाच्या उड्डाणासाठी तयार असल्याचे या अभिनव प्रयोगातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.


देवेंद्र फडणवीसांचे पहिल्याच भाषणात चौकार-षटकार-


राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड झाली मी तमाम विधानसभा सदस्यांच्या वतीने आणि राज्याच्या 12 कोटी जनतेच्या वतीने अभिनंदन करतो. विरोधी पक्षाचे आभार मानतो, काही अपवाद वगळता अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्याची परंपरा आहे, त्या परंपरेचा मान राखत आपल्या निवडीला विरोधी पक्षाच्या सदस्यांचे आणि गटनेत्यांचे आभार मानतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. खरं म्हणजे अध्यक्ष महोदयांनी मी पुन्हा येईन म्हटलं नव्हतं, पण तरीही आपण परत आलात याचा मला मनापासून आनंद आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला. 


इतर महत्वाच्या बातम्या 


राहुल नार्वेकरांनी 'मी पुन्हा येईन' म्हटलं नव्हतं, पण नाना पटोलेंमुळे वाट मोकळी झाली; देवेंद्र फडणवीसांचे पहिल्याच भाषणात चौकार-षटकार