पुणे : शिक्षणाचा प्रसार सर्वांपर्यंत व्हावा यासाठी खासगी महाविद्यालयांना (College) 80 च्या दशकात परवानगी देण्यात आली. मात्र, पुढे या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणसम्राट अस्तित्वात आले आणि त्यांनी मनमानी पद्धतीने प्रवेश प्रक्रिया रावबायला सुरुवात केली. त्यातून प्रवेशांसाठी लाखो रुपये घेतले जाऊ लागले. अनेकदा याविरोधात आवाज उठवल्यानंतरही या शिक्षण संस्थांच्या लॉबीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आता पालक आणि विद्यार्थ्यांनी DET च्या कार्यालयात धडक मारल्यावर सरकार याची दखल घेणार का? हे पाहावं लागणार आहे. कारण, आजही इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची लुबाडणूक संस्थाचालकांकडून होत आहे. याविरुद्ध पुण्यातील (Pune) डीईटी कार्यालयातून येऊन संतप्त पालकांनी संस्थाचालकांचा व शिक्षणव्यवस्थेचा निषेध नोंदवला आहे.
इंजिनिअरींच्या प्रवेशाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल कमी झाला असला तरी, आजही लाखो पालक आपल्या मुलांना इंजिनिअर बनविण्याचे स्वप्न बाळगून आहेत. त्यात, उत्तम दर्जाच्या महाविद्यालयातून इंजिनिअर बनवण्यासाठी पालकांची धडपड असते. राज्यात इंजिनिअरीच्या जागा लाखोंच्या संख्येनं उपलब्ध आहेत. मात्र, काही ठराविक महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांचा हट्ट असतो आणि त्यातून काही महाविद्यालयाची कट ऑफ लिस्ट 98 ते 99 टक्क्यांपर्यंत जाते. असं असताना महाविद्यालये प्रवेश प्रक्रियेत बनवेगिरी करत असल्याचा आरोप पालक आणि विद्यार्थ्यांनी केलाय. तसेच, या प्रवेश प्रक्रिया ज्या DTE कार्यालयातून केली, जाते त्या ठिकाणी पालकांनी निषेध नोंदवला आहे.
राज्यात इंजिनियरींगच्या 1,61,743 जागा आहेत. मात्र, या इंजिनियरींगचे प्रवेश देताना महाविद्यालये तीन राउंडची प्रवेश प्रक्रिया पार पाडत नाहीत. पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडनंतर रिक्त झालेल्या जागा तिसऱ्या राऊंडमधे न भरता महाविद्यालये परस्पर भरत आहेत. याप्रकारे ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील जागा सर्वसाधारण गटातील विद्यार्थांना देण्यात येतात. त्यामुळे पालक आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याकडे पालक आता डोळे लावून बसले आहेत. जर प्रवेश मिळाला नाही, तर वर्ष वाया जाण्याचीदेखील शक्यता असल्याचं पालकांचं म्हणणं आहे.
खाजगी महाविद्यालये विद्यार्थांकडून लाखों रुपये घेतात. एका स्पॉट प्रवेशाच्या फॉर्मसाठी किमान 2 हजार रुपये घेतले जात आहे. लाखो विद्यार्थी हे फॉर्म भरत आहेत. त्यामुळे महाविद्यालयांच्या तिजोऱ्या भरल्या जातायत अन् पालकांना आर्थिक फटकादेखील सहन करावा लागतोय. त्यातच EWS प्रमाणपत्र असतानादेखील सीईटी सेलच्या फॉर्मेटमध्ये नसल्याने संस्थांकडून प्रवेश थेट रद्द केले आहेत. तसे मेलही विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे, विद्यार्थी व पालकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या संदर्भात पालकांनी कॉलेजकडे दाद मागितली असल्यास कॉलेजकडून अरेरावी केल्याचा आरोपही पालकांनी केलाय.
नियम काय सांगतो?
नामांकीत शैक्षणिक संस्थांनी कॅपनंतर रिक्त जागा; तसेच मॅनेजमेंट कोट्यातील जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविताना दोन्ही प्रकारच्या जागांची माहिती वेबसाइटवर देणे अनिवार्य आहे. मात्र, याकडे कॉलेजांनी दुर्लक्ष केले आहे.
केवळ कॅपनंतर रिक्त राहणाऱ्या जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज उपलब्ध करुन दिलेले आहेत. त्यातही काही कॉलेजांनी हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरण्याची; तसेच जमा करण्याची सुविधा केली आहे.
अशा परिस्थितीत हे अर्ज भरण्यासाठी केवळ एका दिवसाचा कालावधी दिला आहे. त्यामुळे या जागांवर कॉलेज प्रशासनाशी आर्थिक व्यवहार केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार असल्याची शक्यता आहे.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांता पाटील लक्ष देतील का?
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात पालकांनी संबंधितांकडे दाद मागितली. मात्र, कोणतीही दाद मिळाली नाही. त्यामुळे, आता या खात्याचे मंत्री असलेले चंद्रकांत पाटील तरी यात लक्ष घालणार का?,असा प्रश्न पालकांकडून व विद्यार्थ्यांकडून विचारला जातोय.
पुण्यातील कोणते कॉलेज आहेत?
1) डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेज, आकुर्डी
2) पीआयसीटी, पुणे
3) विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीआयटी)
4) डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेज, पिंपरी
5) कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेज, कोथरूड
6) भारती विद्यापीठ ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन, पुणे
7) इंदिरा इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेज, पुणे
8) पुणे विद्यार्थी गृह इंजिनिअरिंग कॉलेज, पुणे
9) अजिंक्य डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कॉलेज, लोहगाव
10) मॉर्डन इंजिनिअरिंग कॉलेज, पुणे
11) मराठवाडा इंजिनिअरिंग कॉलेज, कर्वे रोड
12) मराठवाडा इंजिनिअरिंग कॉलेज, लोहगाव
13) जेएसपीएम, ताथवडे
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI