पुणे: पुण्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये तलाठी उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या अश्विनी कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहलं आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या तलाठी यांची नेमणूक करण्याबाबत त्यांनी पत्र लिहलं आहे. गेली सहा महिने झाले या पाचही विधानसभा मतदारसंघात पर्वती, शिवाजीनगर, वडगाव शेरी, कॅन्टोन्मेंट व कोथरूड या पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये तलाठी उपलब्ध नाहीत अशी तक्रार देखील त्यांनी यावेळी केली आहे.
अनेक नागरिकांची प्रकरण प्रलंबित आहेत आणि लोकांना त्याचा लाभ मिळत नाहीये अशी तक्रार देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या अश्विनी कदम यांनी केली आहे. या मतदारसंघात तलाठी नेमावा अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे.
काय लिहलं आहे पत्रात?
पुणे शहरांमध्ये आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे काम चालू आहे. परंतु संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरण दाखल केल्यानंतर तलाठी घरी पडताळणीसाठी येत असतात. यानंतर त्यांचा पडताळणी अहवाल सादर केला जातो व त्यावर पुढील कारवाई होते. परंतु गेली सहा महिने झाले या पाचही विधानसभा मतदारसंघात पर्वती, शिवाजीनगर, वडगाव शेरी, कॅन्टोन्मेंट व कोथरूड या पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये तलाठी उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक नागरिकांची प्रकरण प्रलंबित आहेत आणि लोकांना त्याचा लाभ मिळत नाहीयेत. तरी आपणास विनंती आहे की या ठिकाणी तलाठ्यांची नेमणूक त्वरित करावी.