पुणे : पुण्यातील (Pune News) तरुणांचा जीवघेणा प्रवास कॅमेऱ्यात चित्रित झालाय. दिवेघाटातून येताना तरुण अॅम्बुलन्सला (Dive Ghat Viral Video) लटकून प्रवास करत असल्याचं दिसत आहेत. नागरिकांनी संबंधित प्रकार मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं आहे. अशा पद्धतीचा प्रवास जीवावर बेतू शकतं तरीही नसतं धाडस करुन जीवघेणा प्रवास करत आहेत. त्यामुळे अशा मुलांचं काय करायचं असा सवाल आता उपस्थित होत आहे.
पुण्यातील मुक्काम आटोपून संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी दिवे घाट सर करून सासवडला मुक्कामी पोहचला. हरिनामाच्या आणि विठू माऊलीच्या जय घोषाणेने दिवे घाट दुमदुमला होता. अवघड असणारा हा दिवेघाट लाखो वैष्णवानी लिलया पार केलाय. दिवेघाटातील पालखीचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. माऊलींच्या पालखीसाठी अवघा दिवे घाट फुलला होता. पालखी सासवडला गेल्यानंतर दिवे घाटात प्रचंड गर्दी झाले. पुण्याकडे मिळेल त्या वाहनाने नागरिक घरी परतत होते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आह. घाटातून प्रवास करताना चार तरुण चक्क रुग्णवाहिकेच्या मागच्या बाजूला लटकत असल्याचं पाहायला मिळालं. ॲम्बुलन्सला मागे पकडून चौघाजणांनी जीवघेणा प्रवास केल्याचं समोर आलं आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटातून सासवडमध्ये दाखल झाली. या पालखी सोहळ्यानंतर दिवे घाट नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यानंतर या तरुणांनी ॲम्ब्युलन्सला मागे पकडून प्रवास केल्याची माहिती आहे. काही स्थानिक नागरिकांनी हा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. असा धोकादायक प्रवास जीवावर बेतू शकतो. त्यामुळे अशा प्रवास करणाऱ्यांना आळा बसवणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे
काय आहे व्हिडीओमध्ये?
दिवे घाटाकडून हडपसरकडे येताना रात्रीच्या वेळी काही तरुण ॲम्ब्युलन्सला लटकले असल्याचे पाहायला मिळाले. ही ॲम्ब्युलन्स वारकऱ्यांसाठी देण्यात आली आहे. मात्र ॲम्ब्युलन्सच्या मागच्या बाजूला काही तरुण धोकादायकरित्या प्रवास करत असल्याचे दिसत आहेत. एवढत नाही तर या रुग्णवाहिकेचा वेग देखील अधिक होता. हडपसर मार्गे गाडी मिळत नसल्याने हा धोकादायक प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र हा धोकादायक प्रवास जीवावर बेतू शकतो, याचं भान ठेवणं गरजेचं आहे. प्रवास करणाऱ्या तरुणांच्या सुरक्षेबाबत आता सवाल उपस्थित केला जात आहे.
Watch Video: दिवेघाटातून येताना अॅम्बुलन्सला लटकून तरूणांचा प्रवास