Satara Rain News : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची (Heavy Rain) बॅटिंग सुरु आहे. अनेक भागात मुसळधार पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.  दरम्यान, साताऱ्यातील पश्चिम भागात (Western part of Satara) पावसाची कालपासून जोरदार बॅटिंग सुरु आहे. गेल्या 24 तासात कोयना धरण (Koyna Dam) परिसरात 133 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे तर महाबळेश्वर (Mahabaleshwar) परिसरात 102 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात गेल्या 24 तासात 2 टीएमसीची पाण्याची वाढ झाली असून, एकूण पाणीसाठी हा 23 टीएमसी झाला आहे. 


कोयना धरणात 23 टीएमसी पाणीसाठा 


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कोयना धरणात 21000 क्युसेक्सने पाण्याची आवक सुरु आहे. कोयना धरणात गेल्या 24 तासात 2 टीएमसी पाणी वाढले आहे. सध्या कोयना धरणात 23 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना धरण हे 105 टीएमसी क्षमतेचे धरण आहे. धरण परिसरात जर असाचा चांगला पाऊस सुरु राहीला तर धरणाच्या पाणीसाठ्यात लवकरच मोठी वाढ होणार आहे.  दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही सातारा जिल्ह्याच मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्यासाठी हवामान विभागानं आज पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


पुण्यात तब्बल 21 दिवसानंतर मुसळधार पावसाची हजेरी 


गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पावसानं दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. मात्र, कालपासून पुण्यात पावसाला सुरुवात झाली आहे. तब्बल 21 दिवसानंतर पुण्यात पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. काल मंगळवारी सरासरी पुण्यात 12 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.  
या पावसामुळं पिण्याच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटली आहे. दरम्यान, पाच जुलैपासून पाऊस वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर घाटमथ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील नागरिकांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.  


पुण्यात कोणत्या भागात किती पाऊस?


शिवाजी नगर: 12.6 मिमी
पाषाण: 15.4 मिमी 
लवळेः 17.5 मिमी
वडगावशेरी : 12 मिमी 
लोहगाव 5.8 मिमी
मगरपट्टा : 4 मिमी 
चिंचवड: 3 मिमी 
एनडीए : 0.5 मिमी
हडपसर : 0.5 मिमी


आजही राज्यात मुसळदार पावसाचा इशारा


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील कोकणसह संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


सावधान! कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, आज संपूर्ण राज्यात कसं असेल हवामान?