पुणे : दौंड (Daund Crime) येथे कौटुंबिक वादातून डॉक्टर महिलेला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित महिला डॉक्टर ही पतीपासून नऊ वर्षांपासून वेगळी राहते. 14 तारखेला पतीने मुलीच्या मित्राला शिवीगाळ केली. मुलीनं याचं कारण विचारताच त्यानं तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिच्या आईनं मध्यस्थी केल्यावर आरोपीनं तिलाही जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. पीडित महिलेनं पती, दीर आणि सासूविरोधात पोलिसांत तक्रार दिली, त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुढील तपास करत आहेत.  


पीडित महिला आणि तीची मुलगी पतीपासून नऊ वर्षापासून विभक्त राहतात. 14 ऑगस्ट रोजी  सकाळी आठ वाजता मुलीचा मित्र घरी आला होता. त्याचवेळी पीडित महिलेचे पती सदानंद धुमाळ देखील घरी आले. मुलीच्या मित्राला पाहून त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवत केली. मुलीने कारण विचारत तिला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी  मारहाण करण्यास सुरुवात केली.मुलीला वाचवण्यासाठी पीडित महिलाने मध्यस्थी केल्यावर आरोपीनं तिलाही जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर दीर रमेश सखाराम धुमाळ आणि सासू वत्सला आप्पा धुमाळ यांनी देखील मारहाण केली.  त्यानंतर पीडित महिलेने उपजिल्हा रुग्णालय दौंड येथे औषधोपचार घेऊन पोलीस स्थानकत पती, सासू आणि दीराविरोधात  तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा दौंड पोलीस  तपास करत आहे. 


अमरावतीच्या डॉक्टर तरुणीला बुलढाण्यात जबर मारहाण


बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील बारलिंगा गावामध्ये अमरावती जिल्ह्यातील एका डॉक्टर (Doctor) तरुणीला जबर मारहाण करण्यात आली आहे. या डॉक्टर तरुणीचा गावातील लोकांनी विनयभंगही केला. मात्र काही सुज्ञ नागरिकांनी या तरुणीला अंधेरा पोलीस स्टेशनला पोहोचवले आणि अंढेरा पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरुन जबर मारहाण आणि विनयभंगाचे गुन्हे तीन आरोपींवर दाखल केले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हा मातृतीर्थ जिजाऊंचा तालुका मानला जातो. मात्र याच तालुक्यात काल एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली. अमरावती जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी असलेली एक डॉक्टर तरुणी बारलिंगा या छोट्याशा गावात सायंकाळी पाच वाजता आली होती. ही तरुणी गावातील एका घरात शिरली. मात्र या घरातील दोन पुरुष आणि एक महिलेने या तरुणीला जबर मारहाण करत गल्लीत आणि मारहाण करत गावातून फिरवले. या तरुणीला इतकी मारहाण केली की या तरुणीचे कपडे सुद्धा फाटले. सुदैवाने गावातील काही सुज्ञ नागरिकांनी या तरुणीला अंढेरा पोलीस स्थानकात पोहोचवले. अंधेरा पोलिसांनी चौकशीअंती बारलिंगा गावातील एक महिला आणि दोन पुरुषांवर जबर मारहाण करणे आणि विनयभंग करणे असे गुन्हे दाखल केले आहेत.