Pune Dam: पुणे शहर परिसरात (Pune Rain Update) गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांच्या पाण्याची (Water) चिंता आता मिटली आहे. पुणे जिल्ह्याला (Pune Dam) पाणी पुरवणारी धरण जवळपास 100% भरायला सुरुवात झाली आहे. शहर परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) धरणातील पाणीसाठा (Dam Water) झपाट्याने वाढला असल्याचं दिसून येत आहे. 


पुणे शहर आणि धरणक्षेत्रात रात्रभर संततधार पाऊस (Pune Rain) सुरू आहे. त्यामुळे शहर परिसरातील धरणे आता शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. तर खडकवासला आणि मुळशी धरणातून आज पुन्हा एकदा मुळा नदीत विसर्ग वाढवला जाणार आहे. पुण्याला वर्षभर पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्र परिसरात यंदा जोरदार पाऊस होताना दिसत आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यातील अनेक धरणात (Dam Water) 100%च्या जवळपास पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.


पुण्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरूवात



पुण्यात दोन (Pune Rain Update) दिवस पावसाचा जोर कमी झाल्याचं दिसून येत होतं. मात्र आज पुनहा एकदा सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. पुणे शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) धरण क्षेत्रातील पाणीसाठा वाढला आहे. शहर परिसरातील सर्व धरणे भरल्याने वर्षभरातील पुणेकरांची पिण्याची पाण्याची चिंता आता मिटली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे (Pune Rain Update) या दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


 


पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठ्याची आकडेवारी


भाटघर 92%
नीरा देवघर 87%
टेमघर 90%
खडकवासला 81%
पानशेत  91% 
वरसगाव 86% 
मुळशी 91%
पवना 90%
कलमोडी 100%
वीर धरण 92


मुळशी धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदी पात्रामध्ये विसर्ग वाढवणार


मुळशी धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 2460 क्युसेक्स विसर्ग वाढवून सकाळी 9 वा. 6051 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी, अशी माहिती देण्यात आली आहे. 


खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदी पात्रामध्ये विसर्ग वाढवणार



खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 11704 क्युसेक्स विसर्ग वाढवून सकाळी 9:00 वा. 13981 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी अशी माहिती देण्यात आली आहे.