पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील जाधववाडी वडाचा मळा परिसरात प्रेम संबंधातून आपल्या मित्राच्या मदतीने प्रेयसीने तिच्या प्रियकराला दगडाने ठेचून मारहाण केली. या घटनेची दृश्य नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याने व्हायरल झाली आहेत. दगडाने केलेल्या मारहाणीत प्रियकर गंभीर जखमी झाला आहे.
तू तुझ्या पतीला आणि मुलांना सोडून माझ्याकडं ये
संबंधित प्रियकर प्रेयसीला तू तुझ्या पतीला आणि मुलांना सोडून माझ्याकडं ये असं म्हणत होता. त्यामुळे वारंवार प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात भांडणे होत होती. त्यामुळे या भांडणाला वैतागून मित्रासोबत मिळून प्रियकराला दगडाने ठेचले. दगडाने केलेल्या मारहाणीत प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांत प्रेयसी आणि तिचा मित्र आरोपी प्रेमदास विठ्ठल चव्हाण यांच्या विरोधात भा. न्या. सं .109, 115 (2) , 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
फिर्याद देणारा नवराच मुख्य आरोपी निघाला
दरम्यान, अज्ञात व्यक्तींनी बायकोचा खून केल्याची फिर्याद देणारा नवराच आरोपी निघाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यामुळे नवऱ्यानेच पत्नीला शॉक देऊन तसेच गळा आवळून खून केल्याचे तपासात उघडकीस आले. शीतल स्वप्नील रणपिसे (वय 23, रा. रांजणगाव सांडस, ता. शिरुर, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती स्वप्नील शामराव रणपिसे (वय 26) याला अटक करण्यात आली आहे. शिरुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्नील उच्चशिक्षित असून सात महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. मात्र, त्याचा स्वभाव संशयी होता. शीतल 3 जुलै रोजी घरात एकटी होती. दुपारी दोनच्या सुमारास स्वप्नील घरी आला. तेव्हा दरवाजा बंद होता. त्याने शीतलच्या मोबाइलवर संपर्क साधला तेव्हा तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने चुलतभाऊ रणजितला बोलवून घेतले. घरात मागून प्रवेश केल्यानंतर शीतल घरात बेशुद्धावस्थेत पडली होती. तिच्या गळ्याजवळ दोरी गुंडाळली होती. तिच्या अंगठ्याला इलेक्ट्रिक वायरने शॉक दिला होता. शीतलला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले.
नवविवाहित तरुणीचा खून झाल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली. तपासात स्वप्निलवर संशय बळावला. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तेव्हा चारित्र्याच्या संशयातून त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.
इतर महत्वाच्या बातम्या