पुणेपुण्याच्या (Pune Crime) मध्यवर्ती भागात पूर्ववैमनस्यातून खून करणाऱ्या तरूणांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. नाना पेठेतील नवा वाडा या ठिकाणी पूर्ववैमनस्यातून अक्षय वल्लाळ या तरुणाचा चाकू भोकसून खून करण्यात आला होता. 


महेश नारायण बुरा, किशोर अशोक शिंदे (दोघेही रा. नवा वाडा, नाना पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अतुल गंगाधर गायकवाड (वय 33, रा. नाना वाडा, नाना पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आळा आबे.


अक्षय ज्या भागात राहिला होता त्या भागात अक्षयचं वर्चस्व होतं आणि हेच या दोघांच्या डोळ्यात खूपच होतं. हा राग मनात धरून त्या दोघांनी अक्षयचा काटा काढायचा ठरवलं. अक्षयची काही दिवसांपूर्वी दोघांसोबत याच गोष्टीवरून वाद विवाद झाले होते. याचाच राग मनात धरून त्या दोघांनी सोमवारी मध्यरात्री  नवा वाडा परिसरातील एका इस्त्रीच्या दुकानाजवळ अक्षयवर चाकूने वार केले. तसेच त्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून  निघृण खून केला. अक्षयवर आरोपींनी 35  वार केले होते.  गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  या दोन्ही जणांवर समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दौंड तालुक्यात गेल्या 24 तासात दोन खून


दौंड तालुक्यातील यवतमध्ये 46 वर्षीय इसमचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दौंड तालुक्यातील यवत मधील पालखी तळाजवळ रात्री 11 ते 12 दरम्यान हा खून झाला.  आज सकाळी 11 च्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे.  संजय बनकर अस खून झालेल्या इसमाचे नाव आहे. संजय बनकर हे मूळचे सोलापूरचे आहेत. परंतु गेल्या काही वर्षापासून ते पुण्यातील चंदन नगरमध्ये तर कधी सासुरवाडीत ते वास्तव्यास होते. संजय बनकर यांची दौंड ही सासरवाडी आहे. यवत मधील पालखी तळावरील शेडमध्ये त्यां मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर  काल दौंड शहरातील बीएसएनएलच्या ऑफिसमध्ये सुरक्षाकाची हत्या करण्यात आली. त्या घटनेला 24 तास होण्याआधीच दुसरी खुनाची घटना घडली आहे..