Pune Crime News: पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये क्षुल्लक कारणावरून मारहाणीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या तरुणांनी रांगेत उभं न राहता आधी मला पेट्रोल भरू दे असं म्हणत मारहाण (Pune Crime News) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे. आधी पेट्रोल भरण्यावरून 2 जणांनी तरुणाला मारहाण केल्याच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला.
पुणे शहरातील हडपसर भागात असणाऱ्या एका पंपावरील ही घटना घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल दुपारी पुण्यातील हडपसर भागातील एका पेट्रोल पंपावर एक तरुण त्याच्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभा होता. दरम्यान, त्याच ठिकाणी 2 जण आले. त्यांची दुचाकी घेऊन त्या तरुणाच्या पाठीमागे येऊन न थांबण्याऐवजी त्यांनी त्याला आधी मला पेट्रोल भरू दे अशी दादागिरी (Pune Crime News) केली.
यावरच न थांबता त्या तरुणांनी त्याची कॉलर पकडत त्याला मारहाण करायला सुरुवात केली. तसेच त्या ठिकाणी दहशत माजवली. ही सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. नितेश गुप्ता असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मोठ्या प्रमाणावर अशा दादागिरी, कोयता हातात घेऊन दहशत माजवणं असे प्रकार वाढत असल्याचं समोर आलं आहे.
पुण्यातील कॅम्प परिसरात कोयता गँगचा धुमाकूळ
ऐन गटारीच्या दिवशीच कोयता गँगच्या टोळक्याने एका वाईन शॉपची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील कॅम्प परिसरात रविवारी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोयता गँगची (Koyata Gang) दहशत वाढताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये अशा घटनो मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र दिसून येत आहे, पोलिस आणि प्रशासन या घटनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या कोयता गँगच्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे.
पिझ्झा खायची लहर, हॉटेलचालकाने नकार देताच केली मारहाण
पिझ्झा न दिल्याने हॉटेल चालकाला मारहाण (Pune Crime News) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील खराडी परिसरात घडला आहे. ही घटना 28 जुलै रोजी खराडी येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अक्षय पाचारणे, अमोल सातव, प्रीतम कुलकर्णी, विशाल सातव या चौघांवर (Pune Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.