पुणे : जमिनीच्या वादातून अनेक प्रकार घडल्याचं आपण (Pune Crime News) पाहिलं आहे. अनेकदा एकमेकांच्या हत्या केल्याचंदेखील आपण पाहिलं आहे. मात्र आता पुण्याच्या राजगड तालुक्यातील कोंढवळे गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित तरुणीने केला आहे. यामुळे कोंढवळे गावात मोठी खळबळ उडाली आहे.
ट्रॅक्टर आणि जेसीबी घेऊन दावा न्यायप्रविष्ट असलेल्या जमिनीचा बेकायदेशीर पध्दतीने ताबा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी हे सगळं पाहत असलेल्या तरुणीच्या अंगावर थेट माती टाकण्याचा प्रयत्न केला. साधारण 25 ते 30 जण आले आणि थेट तिच्या अंगावर माती टाकली. यावेळी तिला गाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला, असा आरोप तरुणीने आणि तिच्या घरच्यांनी केला आहे.
तरुणीने आरोप केलेले संबंधित नागरिक पोलिसांसह जमिनीचा ताबा घेण्यासाठी आले असताना, तरुणी आणि त्या नागरिकांमध्ये झालेल्या वादा दरम्यान ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत साधारण कंबरेपर्यंत मातीमध्ये तरुणी गाडल्या गेल्याचं दिसत आहे. संबंधित तरुणीने हा प्रकार घडल्यानंतर तिच्या घरच्यांना सांगितला आणि त्यानंतर घरातील सगळ्यांनी या घटनेसंदर्भात वेल्हे पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. मात्र या संदर्भात अजून कोणत्याही गुन्ह्याची नोंद झाली नाही आहे. घडलेल्या या प्रकरणाती पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे मात्र गुन्ह्याची कारवाई करण्यात आली नाही. ही कारवाई कोणाच्या दबाबातून करण्यात येत नाही का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
घडलेली ही घटना अत्यंत वाईट असून या घटनेची संपूर्ण माहिती घेऊन योग्य कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आतापर्यंत अनेकदा असे वाद आपण पाहिले आहेत भावकीत असे अनेक वाद ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात देखील होतात. एकमेकांची हत्या करण्यापर्यंत हे वाद टोकाला जातात. मात्र तरीही यासंदर्भात ठोस अशी शिक्षा झालेली फार कमी वेळा दिसते. त्यामुळे असे प्रकार कधी थांबतील. जमिनीचे वादातून होणाऱ्या हत्या आणि गुन्हेकधी थांबतील, असा प्रश्न निरुत्तरीत आहे.
इतर महत्वाची बातमी-