पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून  गोळीबाराच्या  (Pune Crime News)

   घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली त्यानंतर तीन ते चार गोळीबार किरकोळ कारणांमुळे घडले. त्यामुळे आता पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहे. पुणे पोलीस आता बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची (Pistol) झाडाझडती घेणार आहे. या झाडाझडतीची तयारी पुणे पोलिसांनी (Pune Police) सुरु केली आहे. विविध भागातील पोलीस ठाण्यातून माहिती मागवली जात आहे. 


मागील महिन्याभरात राज्यभरात गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या. त्यासोबतच पुण्यातदेखील औंध परिसरात सराफा व्यावसायिकाने मित्रावर गोळी झाडली आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. अशाच काही घटना राज्यातदेखील घडल्या त्यामुळे आता पिस्तूल धारकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. कोणाकडे बेकायदा पिस्तूल आहे?  किती गुन्हे दाखल आहे? कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहे? पिस्तुलचा वापर नेमका कोणत्या शहरात आणि कशासाठी केला आहे?  या सगळ्याची माहिती घेतली जाणार आहे. महत्वाचं म्हणजे हे गुन्हेगार आता नेमकं काय करतात? याचीदेखील माहिती घेतली जाणार आहे. 


पाच वर्षात गुन्हे वाढले


मागील पाच वर्षात पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. देशभरातून लोक वेगवेगळ्या कारणांसाठी पुण्यात वास्तव्यास येतात. त्यामुळे पुण्याची लोकसंख्यादेखील वाढली आहे. त्यामुळे गुन्हेगारीदेखील वाढली आहे. ही गुन्हेगारी आता प्रत्येक पुणेकांच्या धोक्याची आहे. यात मागील पाच वर्षांचा पिस्तून बाळगून केलेल्या गुन्ह्यांची संख्यादेखील मोठी आहे. 382 गुन्हे पाच वर्षात दाखल झाली आहेत. विनापरवाना पिस्तूल वापरल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातच 461 पिस्तूलदेखील जप्त करण्यात आले आहे. 


सराईत गुन्हेगाराची आणि गुन्ह्यांची यादी तयार


पुण्यात गुन्हेगारीचा आलेख वाढता आहे. पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पहिल्याच काही दिवसांच ही गुन्हेगारी रोखण्यासाठी चंग बांधला आहे. त्यातच पुण्यातील कुख्यात गुंड आणि गुन्हेगारांना बोलवून त्यांची परेड काढली. त्यानंतर ड्रग्स तस्करांना बोलवून त्यांना सज्जड दम दिला. कोणत्याही प्रकारचा गुन्हा करायचा विचार केला तर याद राखा, अशा शब्दांत त्यांना दम दिला. त्यानंतर सोशल मीडियावरुन गुन्हेगारी पसरवायची नाही, रिल्स पोस्ट करायचे नाही, अशा कडक शब्दांत सूचना दिल्या. त्यानंतर आता पिस्तूल धारकांवर पुणे पोलिसांनी नजर असणार आहे. या सगळ्या गुन्हेगाराची यादी तयार केली आहे. त्यांना बोलवून दम दिला जण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाची बातमी-


20 फेब्रुवारीपासून पुण्यातील ओला, उबरची सेवा बंद राहणार, नेमका का घेतला निर्णय?