मुंबई : पुण्यातील एका नियोजित कार्यक्रमासाठी आलेल्या पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) यांच्या गाडीवर हल्ला (Attack) करण्यात आला होता. भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचे समोर आले होते. मात्र, याचवेळी हल्ला करणाऱ्या लोकांमध्ये अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) देखील लोकं होते असेही आरोप त्यावेळी करण्यात आले. दरम्यान, आता शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत "अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाचे पुणे शहर उपाध्यक्ष दत्ता सगरे हे या व्हिडीओमध्ये निखिल वागळे यांच्या गाडीवर जीव तोडून लाथ घालताना दिसत आहेत,” असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे आमच्या पक्षाच्या लोकांनी हल्ला केल्याचे आरोप चुकीचे आणि खोटे असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच म्हटले होते. 


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. अजित पवार पुण्यातील गुंडगिरिला बळ देत असल्याचा ट्विटद्वारे गंभीर आरोप केला गेला आहे. अजित पवार यांची दादागिरी आम्ही मोडीत काढू असा थेट इशारा देखील देण्यात आला आहे. अजित पवार यांच्या पक्षाचा पुणे शहराचा उपाध्यक्ष पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीला लाथा मारत असल्याचा व्हीडिओ ट्विट करत पुण्यात अराजकता माजवण्यसाठी अजित पवार स्वतःचा गुंडांचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. 


ट्विटमध्ये काय म्हटल आहे?


“अजून किती काळ जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणार?, तुमची 'दादा'गिरी आम्ही मोडीत काढू!... अजित पवार यांच्या गटाचे पुणे शहर उपाध्यक्ष दत्ता सगरे हे या व्हिडीओमध्ये निखिल वागळे यांच्या गाडीवर जीव तोडून लाथ घालताना दिसत आहेत.  पत्रकारांसमोर सपशेल खोटं बोलणारे हे उपमुख्यमंत्री जनतेची दिशाभूल करू पाहत आहेत. पुण्याचे पालकमंत्री स्वतः पुण्यात अराजकता माजवायला आपले गुंड वापरत आहेत, हेच यावरून दिसत आहे.


काय म्हणाले होते अजित पवार? 


पत्रकार निखील वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याने याचे राजकीय पडसाद देखील उमटताना पाहायला मिळाले. दरम्यान, भाजप आणि अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, यावर प्रतिक्रिया देतांना अजित पवार म्हणाले होते की, “या हल्ल्यात राष्ट्रवादीचा सहभाग असल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे नाव घेण्यात आले. पण राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता तिथे नव्हता. जे असतील त्यांनी आरोप देखील खरे करावेत. तसेच तिथे जे असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम पोलिसांकडून केले जाईल,” असे जीत पवार म्हणाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nitesh Rane : निखील वागळे स्वस्तात परत गेला, पुणे भाजपने काम पूर्ण करावं, नाहीतर मला सांगा: आमदार नितेश राणे