पुणे : राज्यभरात घडणारे गोळीबार आणि गुंडांच्या टोळ्यांच्या हैदोसावरुन राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. मुंबईतील अभिषेक घोसाळकर हत्याकांडावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विविध विषयावर भाष्य करताना, पुण्यातील शरद मोहोळ हत्याकांडावर (Sharad Mohol Case)  रोखठोक प्रतिक्रिया दिली. गुंडांनीच गुंडांचाच काटा काढला हे तर खरं आहे की नाही? का दुसरं कोणी आलं होतं? असं अजित पवार म्हणाले.


अजित पवारांनी आज पुणे विमानतळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांना अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर मॉरिस नोरोन्हाने (Mauris Noronha) केलेला गोळीबार यासह अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी गेल्या काही दिवसांपासून पुणे, उल्हासनगर गोळीबार आणि नुकतंच झालेलं घोसाळकर हत्याकांड यावर प्रतिक्रिया दिली. 


मुळशी हत्याकांडावर भाष्य


अजित पवारांनी मुळशीतील शरद मोहोळ हत्याकांडावर भाष्य केलं. अजित पवार म्हणाले, "पहिली घटना मुळशीला घडली. ते गुंडच प्रवृत्तीचे होते. गुंडांनीच गुंडांचाच काटा काढला हे तर खरं आहे की नाही? का दुसरं कोणी आलं होतं? उल्हासनगरच्या बाबतीत जरी सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी कारवाई ताबडतोब झाली. त्यांचे जमिनीच्या व्यवहारातून गोळीबार झाला. ते दोघेही निवांत पोलीस स्टेशनमध्ये बसले होते. एक नागरिक म्हणून पोलिसांचं खरोखरच कौतुक केले पाहिजे.  कारण आत गोळ्यांचा आवाज आल्यानंतर, एकाच्या हातात रिव्हॉल्वर असताना देखील.. दुसऱ्याकडे (महेश गायकवाड) पण रिव्हॉल्वर होती. त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला, पण तो त्या झटापटीत त्याला काढता आलं नाही. नाहीतर आणखीन काही वेगळं घडलं असतं का सांगता येत नाही, असं अजित पवार म्हणाले.


टोळीयुद्धातून  मुळशी हत्याकांड


पुण्याला हादरवून टाकणारी शरद मोहोळची हत्या गुंडांच्या टोळीवादातूनच आणि वर्चस्वातून करण्यात आली होती. मारेकरी साहिल मुन्ना पोळेकर याने सुतारदऱ्यात भररस्त्यात गोळ्या झाडून शरद मोहोळची हत्या केली होती. यावरुन पुण्यातील टोळीयुद्ध पुन्हा एकदा पाहायला मिळालं. या प्रकरणी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणेसह 16 जणांना अटक करण्यात आली आहे. 


साथीदार होते पण त्यांनीच काटा काढला 


शरद मोहोळचे हे मारेकरी त्याचे साथीदार म्हणून त्याच्या टोळीत काम करत होते. यातील साहील पोळेकर हा तर हत्येच्या आधी काहीवेळ शरद मोहोळच्या घरी त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात देखील सहभागी होता. वरवर शरद मोहोळचे साथीदार असल्याचे दाखवणारे हे मारेकरी शरद मोहोळवर नाराज होते. विठ्ठल गांडले याच्यासोबत शरद मोहोळची मुळशी तालुक्यात जुनी भांडणे होती तर साहील पोळेकर याच्यासोबत देखील जमीन आणि पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद झाले होते. त्यातून त्यांनी शरद मोहोळच्या हत्येची योजना आखली आणि अतिशय थंड डोक्याने ती अंमलात आणली. या प्रकरणी पोलिसांनी 16 जणांना अटक केली आहे. 


वर्चस्वाच्या लढाईनं जीव घेतला


पुण्यातून लवासा  सिटीकडे जाताना वाटेत लागणारं  मुठा नावाचं  गाव हे शरद मोहोळच तर तिथून पुढे पंचवीस किलोमीटर अंतरावरील वेगरे नावाचं गाव शरद मोहोळची हत्या घडवून आणणाऱ्या नामदेव कानगुडेच  तर मुठा गावापासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेलं उरवडे गाव आहे.  या हत्येतील दुसरा मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल शेलारचे आहे. मुळशी खोऱ्यातील या लहान - लहान गावांमध्ये वर्चस्व कोणाचं राहणार यातून निर्माण वादातून शरद मोहोळची हत्या झाल्याचं समोर आले आहे.  


मामाचा अपमान; भाच्यानं काढला काटा 


2010 मध्ये नामदेव कानगुडेकडून स्थानिक वादातून शरद मोहोळच्या मावस भावाला मारहाण करण्यात आली. शरद मोहोळने त्याचा बदला घेण्यासाठी नामदेव कानगुडेला मारहाण केली. पुढे दोघांमध्ये समझोता झाला आणि दोघे एकत्र काम करायला लागले. मात्र मागीलवर्षी वेगरे गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत नामदेव कानगुडेची भावजय निवडणुकीला उभी राहिली. कनगुडेने शरद मोहोळकडे त्यासाठी मदत मागितली. मात्र ती न मिळाल्यानं दोघांमध्ये वाद झाला. त्यातून अपमानित झालेला नामदेव कानगुडेला रडताना त्याचा भाचा असलेल्या साहिल पोळेकरने पाहिलं आणि दोघांनी मिळून शरद मोहोळचा काटा काढायचं ठरवलं. 


VIDEO : अजित पवार नेमकं काय म्हणाले?



 


इतर महत्वाची बातमी-


Ajit Pawar On Pune Crime : परेड काढूनही कोणाची मस्ती असेल तर पोलीसी खाक्या दाखवायला लागेल; अजित पवारांकडून गुन्हेगारांना तंबी