पुणे : कात्रज येथील भिलारेवाडी परिसरातून अपहरण

  (Pune Crime News) करण्यात आलेल्या 12 वर्षीय मुलाची सुखरूप सुटका (Kidnap) करण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे. मुलाच्या सुटकेसाठी संशयिताने 60 लाख रुपयांची खंडणी मागितली होती, त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनने फिल्मी स्टाईलन शोध घेतला. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित राजेश सुरेश शेलार याने भिलारेवाडी येथील 12 वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. या तरुणाची सुटका करण्यात पोलिसांना यश आले असले तरी संशयित अद्याप फरार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


मुलाचे वडील मालमत्तेचा व्यवहार करतात, तर पोलिस शेलार यांच्याविषयी अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. फोन लोकेशनची माहिती घेतली असता संशयिताने मुलाला सातारा जिल्ह्यातील पाथेघर येथील डोंगराळ भागात ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखा युनिट 2 ने तातडीने घटनास्थळी धाव घेत सातारा पोलिसांसह मुलाची सुखरूप सुटका करून त्याला त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवलं. मात्र, संशयिताने अटक टाळून घटनास्थळावरून पळ काढला. आरोपींचा शोध घेऊन त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


मुलाचा शोध कसा घेतला?


या प्रकरणी तीन संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील एक आरोपी हा मुलाच्या परिसरात राहतो. त्याने मुलाशी गोड बोलून आपल्यासोबत यायला सांगितलं. त्यानंतर मुलगा त्याच्यासोबत गेला. काही वेळातच मुलाला थेट  सातारा जिल्ह्यातील पाथेघर येथील डोंगराळ भागात घेवून गेले. याची माहीती पोलिसांना मिळाली. त्यांनी शोधकार्य सुरु केलं मात्र डोंगराळ भागात लोकेशन ट्रॅप करणं पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं. साताऱ्याकडील डोंगराळ भागात अनेक ठिकाणी नेटवर्कची मोठी समस्या आहे. त्यातच या संशयितांचं लोकेशन शोधणं कठिण गेलं. मात्र गावकऱ्यांनी मदत केली. पोलिसांनी गावकऱ्यांना सोबत घेत थेट अख्या डोंगरालाच वेढा घातला. डोंगराभोवतीच सापळा रचला. यात पोलिसांनी मुलाला सुखरुप शोधलं मात्र तोपर्यंच आरोपींनी मुलाला एका जागेवर सोडून दिलं होतं आणि पळ काढला होता. पोलिसांनी मुलाला कुटुंबियांकडे सोपवलं आहे आणि पोलीस आता आरोपी असलेल्या अपहरणकर्त्यांचा युद्ध पातळीवर शोध देत आहे. कोणत्याही प्रकारचे संशयित आढळले. तर आपल्या मुलांना समज देऊन ठेवा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Crime News : पुण्यातील नाईट धिंगाणा बंद होणार; हॉटेल आणि पबसाठी पुणे पोलिसांची नवी नियमावली जाहीर