पुणे :  पुण्यात गुन्हेगारीच चांगलीच वाढ होताना (Pune Crime news) दिसत आहे. त्यातच शिक्षणाचं (CRIME)माहेरघर असलेल्या पुण्यात तरुणी असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. पायी घरी जाणाऱ्या तरुणीला भर रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करण्यात आला. पुण्यातील खराडी परिसरात हा प्रकार घडला आहे. काल रात्री एकच्या सुमारास ही घडना घडली आहे. या संपूर्ण प्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोन जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.


नेमकं काय घडलं?


तरुणी रात्र एक वाजता खराडी परिसरातून कामावरुन घरी परतत होती. त्याचवेळी या परिसरातील काही तरुण रस्त्याच्या कडेला शेकोटी करत बसले होते. ज्यावेळी तरुणी एकटी जाताना दिसली त्यावेळी या तरुणांनी तरुणी जवळ जाऊन बोलाायचं आहे, असं सांगितलं. हे पाहून तरुणीने बोलण्यास नकार दिला. त्यानंतर या तरुणांनी काही वेळ तरुणीचा पाठलाग केला आणि तिच्या बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तरुणी घाबरली आणि तरुणीने तिच्या मित्रांना कॉल केला. त्यावेळी मित्राने या तरुणांकडे जाब विचारला असता या तरुणांनी तरुणीच्य दोन मित्रांना लाकडाच्या दांडक्याने  मारहाण केली. तसेच एका मित्राच्या मानेवर तर दुसऱ्या मित्राच्या हातावर खांद्यावर लाकडी दांडक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. रुपेश हुंडारे आणि सिद्धांत सिंग असं तरुणीच्या जखमी झालेल्या मित्रांची नावं आहेत. 


याबाबत खराडी परिसरात राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्या फिर्याद दिली आहे. यावरुन सागर पाटील व सौरभ कोंडके व इतर दोन अनोळखी मुलांवर आयपीसी 354(ड), 324, 504,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत फिर्यादी यांचे मित्र रुपेश हुंडारे आणि सिद्धांत सिंग जखमी झाले आहेत.


पुण्यात महिला असुरक्षित?



पुण्यात मागील काही दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे शिक्षणाच्या माहेरघरात महिलाच असुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दर्शना पवार हत्या प्रकरण आणि त्यानंतर सदाशिव पेठेत भर रस्त्यात प्रेमातून कोयत्याने केलेल्या हल्ल्याने महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर महिलांवरील हल्ले आणि या सगळ्या घटना रोखण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र घटनांची संख्या कमी होताना दिसत नाही आहे. यातच पुन्हा एकदा हल्ला झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. 


इतर महत्वाची बातमी-


पुण्यात कम्प्युटर इंजिनिअर तरुणीचं डिलिव्हरी बॉयसोबत 'इश्क', आईने विरोध करताच 'आशिक'ने जे काही केलं त्याने पाषाण हादरलं!