पुणे: लातूर येथून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका 22 वर्षेीय तरुणीचं अपहरण करुण तिच्याच मित्रांनी खंडणीसाठी हत्या (Pune Murder) केल्याचं समोर आलं आहे. कर्जबाजारीपणातून आरोपींनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी अधिकचा तपास सुरु आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी सुपा परिसरातील एका शेतात मृतदेह पुरून (Pune Crime News) टाकला. खून केल्यानंतर आरोपींनी तरुणीच्या मोबाईलवरून तिच्या कुटुंबीयाकडे खंडणी देखील मागितली. पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा उलगडा केला असून तीन आरोपींना अटक केली आहे.
भाग्यश्री सूर्यकांत सुडे (वय 22) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी शिवम फुलावळे, सागर जाधव आणि सुरेश इंदोरे या तिघांना अटक केली आहे. मयत तरुणीचे वडील सूर्यकांत ज्ञानोबा सुडे (वय 49) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार दिली होती.
नऊ लाख रुपये द्या अन्यथा मुलीला ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळची लातूरची असलेली भाग्यश्री वाघोली परिसरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत होती. 30 मार्चच्या रात्री नऊ वाजताच्या सुमारास ती बेपत्ता विमानतळ परिसरातील फिनिक्स मॉल येथून बेपत्ता झाली होती. दरम्यान मुलींसोबत संपर्क होत नसल्याने तिच्या आई-वडिलांनी पुणे गाठून पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. याच कालावधीत तिच्या आई-वडिलांच्या मोबाईलवर खंडणीसाठी मेसेजही आला. नऊ लाख रुपये द्या अन्यथा मुलीला मारून टाकू अशी धमकी त्यामध्ये देण्यात आली होती.
सुप्यातील एका शेतात मृतदेह पुरला
पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. तीनही आरोपी मयत तरुणीचे मित्र आहे.30 मार्चच्या रात्री आरोपींनी भाग्यश्रीचे अपहरण केले आणि खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी नगर जिल्ह्यातील सुपा परिसरातील एका शेतात मृतदेह पुरून टाकला.
भाग्यश्रीचे अपहरण केल्यास आपल्याला पैसे मिळू शकतात असा आरोपींचा समज
प्राथमिक माहितीनुसार आर्थिक कर्जबाजारीपणातून आरोपींनी हे कृत्य केले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाग्यश्रीचे अपहरण केल्यास आपल्याला पैसे मिळू शकतात असा आरोपींचा समज झाला. आणि त्यातूनच त्यांनी ही कृत्य केले. तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुणे पोलीस अधिक तपास करत आहे.
हे ही वाचा :
अनैसर्गिक संबंधासाठी आधी अपहरण, नंतर हात-पाय बांधून पाण्यात टाकलं; अल्पवयीन मुलाच्या खुनामुळे ठाण्यात खळबळ!