Pune Crime News पुणे: पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. महिला शिक्षिकेने 17 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्‍याचार (Pune Crime News) केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील गंज पेठेतील एका शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


सदर प्रकरणी महिला शिक्षकेला पोलिसांनी अटक केली असून खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित शिक्षिकेवर पोलिसांनी पॉक्‍सो कायद्यानुसार गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.  हा प्रकार पुण्यातील गंज पेठेत असणाऱ्या एका शाळेच्‍या आवारात शुक्रवारी उघडकीस आला. पीडित मुलगा हा भवानी पेठ परिसरात राहत असून तो इयत्ता दहावीत आहे. बोर्डाची परीक्षा होण्यापूर्वी शाळेत सुरू असलेल्या  प्रिलियम परीक्षेसाठी तो शुक्रवारी शाळेत आला. 


नेमकं काय घडलं? (Female teacher sexually assaulted a 17 year old student)


आरोपी महिला सुद्धा या शाळेत शिक्षिका असून ती धानोरी येथे वास्तव्यास आहे. अल्‍पवयीन विद्यार्थ्याला तिने त्‍याला प्रेमाच्‍या जाळ्यात ओढले. आरोपी महिला शिक्षिकेने त्‍याला तिच्‍यासोबत शाळेच्‍या आवारातच जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्‍यासाठी भाग पाडले. ही शाळा प्रशासनाला कळताच शाळेच्‍या व्‍यवस्‍थापनाने संबंधित शिक्षिकेच्या संदर्भात पोलिसात कळवले तसेच तिला अटकही करण्‍यात आली. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर ही कारवाई झाली.


पुण्यातील पबने सेलिब्रेशनच्या नावाखाली टोक गाठलं-


नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबकडून नववर्षासाठी आयोजित पार्टीच्या निमंत्रितांसाठी या दोन वस्तू देण्यात आल्या आहेत. तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पबने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाबसुद्धा नोंद केले आहेत. या पब व्याव्यस्थापकडून पोलिसांनी याची माहिती घेतली आहे. मात्र कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. 


संबंधित बातमी:


Walmik Karad: वाल्मिक कराडला काल रात्रीच पोलिसांनी बेड्या ठोकल्या?; सीआयडीने दिली महत्वाची माहिती


नागपुरात हत्याकांडाचा थरार! काली माता मंदिरासमोर सख्या मामानेच भाच्याला संपवले, भावाला वाचवायला गेलेला दुसराही गंभीर जखमी