पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून कुत्र्यांच्या (Pune Dog) धुमाकूळ सुरु असल्याचं दिसत आहे. त्याच्या तक्रारीदेखील  (Pune Crime) अनेक येत असतानात आता कुत्र्याच्या पिल्लाला लोखंडी रॉडने अमानुषपणे मारहाण केल्याची घटना पुढे आली आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड लिंक रस्त्यावरील एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरी मधील गुप्ता ट्रेडर्स या दुकानासमोर घडली.


गुप्ता असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी हितेश कुंदनानी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुत्र्याचे पिल्लू वारंवार दुकानाच्या समोरील जागेत येत असल्याने गुप्ता याने कुत्र्याच्या पिल्लाला लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच पिल्लाला मारहाण करत दुकानातून बाहेर रस्त्याच्या बाजूला ढकलले. या मारहाणीत पिल्लाला मार लागला असून त्याला प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


सोसायटीत कुत्रा घुसल्याने विष पाजून घेतला जीव...


काहीच दिवसांपूर्वी एका कुत्र्याला मारहाण करुन विष देऊन ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी तक्रार दाखल करून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमीर खान (23) यांनी कोंढव्यातील अतूर व्हिला विस्टा सोसायटीच्या सुरक्षारक्षक आणि इतर तीन लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांनी कुत्र्याचा वेदनांनी रडण्याचा आवाज ऐकला. तो त्वरीत बाल्कनीकडे धावला जिथे त्याला काही लोक लाठी मारताना दिसले होते, असा दावा खान यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. कुत्र्याला सोसायटीच्या मैदानात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी ते हा प्रकार करत आहेत, असं त्याला सांगण्यात आलं होतं. कुत्र्याला मारहाण करु नका असं खान आणि त्याच्या आईने आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र चौघेही यांचं ऐकायला तयार नव्हते. त्यानंतर खान आणि त्याच्या आईने या घृणास्पद कृत्याची नोंद केली आणि अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाशी संपर्क साधला. थोड्याच वेळात, एक प्राणी मित्र दाखल झाला आणि परिस्थिती पाहिली. त्यावेळी कुत्राचा मृत्यू झाला होता. 
 


पाळीव प्राण्यांना अमानुष वागणूक 


पुण्यातील नागरिक कुत्र्यांना अमानुष वागणूक दिल्याचे प्रकार समोर येत आहे. आमानुष वागणूक देणाऱ्या नागरिकांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात येत आहेत. मात्र असे प्रकार काही संपायचं नाव घेत नसल्याचं दिसत आहे.


इतर महत्वाची बातमी-


Rohit Pawar On Ajit Pawar: भाजपनं अजित पवारांना लोकल नेता केलं, त्यांनी बारामतीत अडकून राहावं ही, भाजपची चाल; रोहित पवारांची अजित पवारांवर बोचरी टीका