पुणे : लैंगिक अत्याचाराची पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरुन एका (Pune Crime News) तरुणाने वीस वर्षीय तरुणीचे नग्न अवस्थेतील फोटो फिर्यादीच्या आईला आणि तिच्या नातेवाईकांना व्हॉट्सअॅपद्वारे पाठवले. इतकंच नाही तर आरोपीने मुलीला ठार मारण्याची धमकीही दिली. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी अर्जुन मोतीराम मुंडे (वय 32 वर्षे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. 


या प्रकरणी अधिक माहिती अशी की पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने एप्रिल महिन्यात आपला वाढदिवस असल्याचे सांगून फिर्यादीला लॉजवर घेऊन जात जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले. फिर्यादीने लोणीकंद पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दिली होती. पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. 9 ऑगस्ट रोजी फिर्यादी तरुणी ही जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. तिच्या आईच्या नातेवाईकांच्या व्हॉट्सअॅपवर फिर्यादीचे नग्न अवस्थेतील अश्लील व्हिडीओ पाठवले. आरोपीने फिर्यादीच्या आईला मेसेज करुन मी तुझ्या मुलीला आणि मुलाला ठार मारुन टाकेन अशी धमकी दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.


नवराच ठरला हैवान! पत्नीला अश्लील नृत्य करायला लावलं


कालच  पुण्यातून एक नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला होता. पतीनेच पत्नीचा नग्न व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पत्नीने थेट समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला होती. पतीनेच असं कृत्य केल्याने विश्वास नेमका कोणावर ठेवावा, असा प्रश्न निर्माण झाला. तक्रारीनुसार, 31 वर्षीय महिलेचं 2015 मध्ये लग्न झाले होते. तेव्हापासून आरोपीने तिला अनेकदा नग्न नृत्य करण्यास भाग पाडले आणि मोबाईल फोनमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड केले. जेव्हा-जेव्हा तिने याला आक्षेप घेतला तेव्हा तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​असे, असेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पत्नीने पुढे असेही आरोप केले की, पतीने तिला अनेक प्रसंगी अश्लील साहित्य दाखवून अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. या त्रासाला कंटाळून ती आई-वडिलांकडे परतली आणि त्यांच्यासोबत राहू लागली. त्यावेळी तेथे तिचा आणि तिच्या कुटुंबाचा छळ सुरुच राहिला. त्यानंतर पत्नी सेक्स रॅकेट चालवते, अशी तिच्या कुटुंबियांसमोर बदनामी केली. हा सगळा प्रकार काही वर्ष महिलेने हे सहन केला. मात्र त्यानंतर पत्नीने त्रासून पोलिसांत धाव घेतली.


इतर महत्वाची बातमी-


Pune ACB Trap : वैद्यकीय महाविद्यालय लाचखोर डीन प्रकरणात मोठी अपडेट; प्रवेशासाठी घेतलेल्या पैशांचं सदस्यांमध्ये वाटप