Pune News: पुण्यात मागील काही दिवसांमध्ये दहशतवादी संघटनांशी संबधित अनेक जणांना ताब्यात घेण्यात आलं, अनेक कारवाया देखील करण्यात आल्या. अशातच पुण्यातील एका नामांकित हॉटेलला दहशतवाद्यांपासून धोका असल्याची शक्यता पुणे पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली आहे. सतत गर्दीने गजबजणाऱ्या "त्या" हॉटेलला पत्र लिहून पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune Police Commissioners Amitesh Kumar) यांनी धोका असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.


पुणे पोलीस आयुक्त यांनी अमितेश कुमार (Pune Police Commissioners Amitesh Kumar) पत्राद्वारे भीती व्यक्त केली आहे. सतत गर्दी होत असल्यामुळे "या" हॉटेलला पुणे पोलिसांनी अनेकदा नोटीस बजावल्या आहेत. हॉटेल मधील डिस्कोथेक रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस देत सुरक्षेचा मुद्दा पोलिसांनी उपस्थित केला आहे. 


दरम्यान, पुणे पोलिसांनी दिलेल्या या पत्रामध्ये सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. या हॉटेलमध्ये लोक दारु पिऊन धिंगाणा घालत असतात. सध्या अतिरेकी कारवाया बाबत अलर्ट आहे. एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करुन बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून त्यातून मोठ्या प्रमाणात जिवीत हानी आणि वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा स्पष्ट इशारा पोलिसांनी या पत्रातून दिला आहे.


हे पत्र स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune Police Commissioners Amitesh Kumar) यांच्या सहीने संबंधित आस्थापनेला पाठवण्यात आले आहे. या हॉटेलने आत्तापर्यंत अनेक वेळा नियमांचे उल्लंघन केले असून त्या ठिकाणी असलेल्या डिस्कोथेकमुळे आजूबाजूला राहत असलेल्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागला आहे,असंही नमूद करण्यात आले आहे. याशिवाय संबंधित हॉटेलवर याआधी सुद्धा अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.


दरम्यान, "त्या" हॉटेल आस्थापनेने वेळोवेळी नियम व कायदे, अटी व शर्थीचा भंग केला आहे असं नमूद केलं आहे. पुढे याच पत्रात पोलिसांनी थेट सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. "सदर ठिकाणी कोणतीही चोख सुरक्षा व्यवस्था नसून एखादी आपत्कालीन घटना झाल्यास कोणत्याही प्रकारची पर्यायी प्रभावी सुरक्षा यंत्रणा नाही" असं देखील पत्रातून म्हटलं आहे.


"एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून आणून त्यातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही", हा इशारा दिला आहे. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या हॉटेलला कारणे दाखवा नोटीस बजावत धोक्याचा इशारा दिला आहे. 


काय लिहलं आहे पत्रात?


आपल्या डिस्कोथेक आस्थापनेने वेळोवेळी नियम व कायदे, अटी व शर्थीचा भंग केला असल्याने, आपल्यावर वेळोवेळी कारवाया करण्यात आल्या असुन आपले वर्तनात कोणताही फरक पडत नाही. आपणावर कायद्याचा कोणताही धाक राहिला नसुन प्रशासनाने दिलेल्या सुचनाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असुन एक प्रकारची प्रशासनाची अवहेलनाच आपले मार्फतीने सुरु आहे. आपण काहीही केले तरी आपले कोणीच काही करु शकत नाही, अशी आपली धारणा झालेली दिसत आहे. 


तसेच सदर ठिकाणी कोणतीही चोख सुरक्षा व्यवस्था नसुन आपल्या हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने सदर ठिकाणी एखादी आपत्कालीन घटना (उदा. आग, चेंगराचेंगरी, अफवा, गॅसगळती) झाल्यास कोणत्याही प्रकारची पर्यायी प्रभावी सुरक्षा यंत्रणा नाही त्यामुळे अशा वेळी मोठ्या प्रमाणात मनुष्य तसेच संपत्तीची हानी होऊ शकते आपली आस्थापना ही कमी जागेत जास्त गर्दी जमवत आहे. आपले हॉटेलेमध्ये लोक दारु पिऊन धिंगाणा करीत असतात त्यांना त्यांचे कोणतेही भान राहत नाही सध्या अतिरेकी कारवाया बाबत अलर्ट आहे एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करुन बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवुन त्यातुन मोठया प्रमाणात जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


संबधित व्हिडिओ -