Sharad Pawar: पुण्यात आज मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज पुण्यातील त्यांच्या मोदीबाग या निवासस्थानी आहेत. अशातच आज(शनिवारी) सकाळी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू (Bachchu Kadu) शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेण्यासाठी मोदी बागेत आले होते. त्यानंतर आता भाजपचे माजी खासदार संजय काकडे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी मोदीबाग परिसरात पोहोचले. संजय काकडे (Sanjay Kakde) यांच्या उपस्थितीने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


आज सकाळीच बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली त्यांच्याशी चर्चा देखील केली. त्यानंतर आता भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) देखील शरद पवारांच्या भेटीसाठी मोदीबागेत पोहोचले आहेत. पुण्यातील मोदी बाग या ठिकाणी संजय काकडे (Sanjay Kakde) शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले, त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. 


भेटीनंतर संजय काकडे यांची प्रतिक्रिया


आज संजय काकडे (Sanjay Kakde) यांनी शरद पवारांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी मी माझ्या वैयक्तिक कामासाठी त्यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. या भेटीत वैयक्तिक कामाबाबत चर्चा झाली आहे. मला माझ्या पक्षांनी याबाबत प्रश्न विचारल्यास मी त्यांना उत्तर देईल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.


भाजप नेते आणि माजा खासदार संजय काकडे यांनी मोदीबागेत शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, माझा मित्र शंकर यांचं काम होतं त्यासाठी मी याठिकाणी आलो होतो.या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही. बच्चू कडूंनी भेट घेतली मात्र, ते कोणत्याही पक्षात जाण्याची रिस्क घेणार नाहीत. मी माझ्या मित्राच्या कामासाठी आलो आहे. माझ्या पक्षाच्या लोकांना माझावर विश्वास असावा. नसेल तर त्यांना मी उत्तर देईल असंही ते पुढे म्हणाले आहेत. 


पक्ष भारतातला मोठा पक्ष आहे त्यामुळे कोणाची पक्षाला गरज वाटत नाही.भाजपचे जे आमदार पुण्यात आहेत ते राहतीलच. ज्याची निवडून येण्याची पात्रता नसेल तर त्यांची अदलाबदली होऊ शकते. पाच जागा आमच्या आहेत या जागा हलणार नाहीत. कसबा, वडगावशेरी, हडपसर या जागांबाबत फेरविचार होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे.