Pune Crime: एकीकडे सर्वत्र दिवाळी सणाचा उत्साह दिसून येत आहे, तर दुसरीकडे पुणे शहर परिसरात मोठ्या घरफोड्या आणि चोरीच्या घटना सुरू आहेत. अनेक लोक बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद असलेली घरं फोडल्याच्या घटना घडल्या आहेत, तर खरेदीसाठी गर्दीत महिलांचे दागिने चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याची माहिती आहे. दिवाळी सणानिमित्त बाजारात दागिने, कपडे खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू असताना चोरीच्या घटना समोर आल्या आहेत.


पुणे शहरात घरफोड्या आणि चोरीच्या घटना मोठ्या घटना घडल्या आहेत. बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांकडून बंद सदनिकांमध्ये घरफोडी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दिवाळी सणानिमित्त बाजारात दागिने, कपडे खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारत असल्याचं चित्र आहे. शिवाजीनगर, वाकडेवाडी बसस्थानकातही गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना घडल्या आहेत. 


मागील चार दिवसांतील पुणे शहरातील काही घटना  


तुळशीबाग येथे पिरंगुटमधील महिलेच्या लहान मुलाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी
टिळेकरनगर मध्ये खरेदी करून घरी निघालेल्या महिलेचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले
शनिपार चौकात जांभूळवाडीतील महिलेच्या पर्समधून सव्वा लाखांचे सोन्याचे ब्रेसलेट चोरी
स्वारगेट बसस्थानक याठिकाणी बसमध्ये चढताना पिंपळ निलखमधील महिलेचे ६८ हजारांचे दागिने लंपास
चंदननगर भागात साडीच्या दुकानात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून ८७ हजारांचे दागिने, रोकड चोरी


दिवाळी सणाचा सध्या सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. दिवाळी सणानिमित्त सोने, कपडे, वस्तू खरेदीसाठी नागरिक बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. मात्र बाजारात सध्या चोरांच्या अनेक घटना घडत आहेत.