पिंपरी-चिंचवड: अजित पवार गटाने मावळ विधानसभेसाठी मैत्रीपूर्ण लढतीचा ठेवलेला प्रस्ताव स्थानिक भाजपने (BJP) फेटाळून लावला. पक्षाने एबी फॉर्म दिला असतानाही स्थानिक भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, असा गौप्यस्फोट करत सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी अखेर 'मावळ पॅटर्न'बाबतचं (Maval Pattern) मौन सोडलेलं आहे. अजित पवार गटातील बंडखोर बापू भेगडे (Bapu Bhegde) यांना भाजप, शरद पवार गटासह सर्व पक्षीयांनी पाठिंबा दर्शवत मावळ पॅटर्न राबवल्याची चर्चा आहे. पण हा कसला मावळ पॅटर्न, हा तर फक्त चार कुटुंबाच्या हिताकरिता राबविण्यात आलेला पॅटर्न आहे, अशी टीका करत सुनील शेळके यांनी भाजप हा चुकीचा पायंडा पाडत असल्याचे म्हटले. भाजपला याचे परिणाम राज्यभर भोगावे लागतील, असा गर्भित इशारा सुनील शेळके यांनी दिला.


ही निवडणूक मावळच्या पुढच्या पाच वर्षांच्या व्हिजनची आहे. मी मावळच्या जनतेच्या साक्षीने या निवडणुकीला सामोरा जातोय. मी पाच वर्षे केलेल्या कामाची पावती येथील जनता मला देईल. मावळमधूम महायुतीचा उमेदवारच निवडून येईल, असे सुनील शेळके यांनी म्हटले. उद्या मावळवमध्ये कमळ किंवा घड्याळज्याच्या चिन्हाचा उमेदवार विजयी झाला तरी मला चालेल. या निवडणुकीत एका विशिष्ट आडनावाच्या लोकांना उभे करुन जिंकण्याचा प्रयत्न आहे, असे सुनील शेळके यांनी म्हटले.


भाजपच्या नेतृत्त्वाने मावळमध्ये भूमिका स्पष्ट करावी: सुनील शेळके


भारतीय जनता पार्टी सुनील शेळके संपवायचा विडा उचललाय हे जे काय सातत्याने सांगत होते मला त्यांना देखील सांगायचे आणि माझ्या माहितीतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी देखील सांगायचं आहे की, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जर उमेदवार असता तर तो नक्कीच आम्ही देखील मान्य केला असता. अजून एक खुलासा देतो काल अजित दादांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी काही परिस्थिती आहे ती सांगितली लक्षात आली आणि त्यावरती दादांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला तर सुनील शेळके बरोबर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करत नसतील तर आपण मैत्रीपूर्ण लढायला मदत करू. मैत्रीपूर्ण या निवडणुकीला सामोरे जाऊ आणि मग काल रवींद्र अण्णासाहेब भेगडे यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी देण्याचं  फडणवीस साहेबांनी जाहीर केले.


 रात्री एक दोन वाजेपर्यंत माझ्याशी बावकुळे साहेब देखील संपर्कात होते. माझ्याशी तटकरे साहेब संपर्कात होते. त्यामध्ये तटकरे साहेब बावनकुळे साहेब आणि बाळाभाऊ भेगडे बोलत होते, त्यांचं काय संभाषण झालं की मला माहित नाही. त्यानंतर बावनकुळे साहेबांनी मला सांगितले की, आम्ही रवींद्र भेगडे यांना भाजपचा एबी फॉर्म देऊन उमेदवारी अर्ज भरायला सांगितला होता. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही.  परंतु, आता त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे काम केले. पण आपल्याला महायुतीचा धर्म पाळावा लागेल. आपण मावळ तालुक्यात चुकीचा पायंडा पडू नका, त्याचे परिणाम मावळ तालुका सोडून इतर देखील तालुक्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माझी भारतीय जनता पक्षातल्या नेत्यांना देखील विनंती असणारे, प्रदेशचे नेत्यांना विनंती असणार आहे की, आपण यावरती लवकरात लवकर निर्णय घ्यावा. जे काय असेल ती भूमिका या स्थानिक असलेल्या नेत्यांना स्पष्ट करायला देखील आपण सूचना द्यावी, असे सुनील शेळके यांनी म्हटले.


आणखी वाचा


तू काहीही कर 'मावळ पॅटर्न' सत्यात उतरवणारच, बाळा भेगडेंनी एकेरीवर उतरत सुनील शेळकेंना ललकारलं