पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात(Pune Crime news)  दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने चक्क पिस्तूल काढल्याची घटना समोर आली आहे. पिस्तूल काढत धमकावताना आपण रोहित पवारांचा (Rohit Pawar) अंगरक्षक असल्याचा दावा त्याने केला आहे.  या घटनेनंतर दोन गटात बाचाबाची झाली. बघ्यांची गर्दी ही घटनास्थळी मोठ्या संख्येने झाली. हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 


हडपसर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेत त्याच्या जवळील पिस्तूल जप्त केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही व्यक्ती खरंच रोहित पवारांचा अंगरक्षक आहे का? याचा तपास आता हडपसर पोलीस करत आहे. परवानाधारक पिस्तुल दाखवल्याने दोन व्यक्तींमधील हाणामारी झाल्यानं ही घटना घडली आहे. हडपसर येथील माळवाडी येथील डॉ. शकीला पठाण यांच्या क्लिनिकजवळ बुधवारी घडलेल्या या घटनेत आरोपीला अटक करण्यात आली आहे.


नेमकं काय घडलं?


फिर्यादी सौरभ तानाजी काळे (वय 27, रा. हडपसर) व त्याचा मित्र दुचाकीवरून जात असताना त्यांच्या वाटेने आरोपी प्रताप धर्मा टक्के (वय 39, रा. कात्रज, कात्रज, पुणे) या खासगी सुरक्षा रक्षकाने चालवलेल्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर वादावादी झाली. परिस्थिती इतकी वाढली की, टक्के यांनी आपले परवानाधारक पिस्तूल, काढून घेतले ज्यावर हिंदीत 'जीएसएफ आशानी' असं लिहिलं होतं. काळे यांच्यावर पिस्तूल दाखवून आरोपींनी उपस्थित प्रत्येक व्यक्तीला गोळ्या घालण्याची धमकी दिली आणि फिर्यादीच्या मित्रांना शिवीगाळ केली.


टक्के याने थेट रोहित पवार यांचा अंगरक्षक असल्याचा दावा केला. मात्र सध्या सगळीकडे अनेक गुन्हेगार आणि भुरटे लोक असे दावे करताना दिसत आहेत. त्यामुळे हा व्यक्ती खरंच रोहित पवारांचा अंगरक्षक आहे का? याचा हडपसर पोलीस तपास करत आहे. 


 पुण्यात गुन्हेगारीचा आलेख वाढताच!


पुण्यात सध्या गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. रोज नवे गुन्हे समोर येत आहे. त्यात दादागिरी आणि भाईगिरी काही संपायचं नाव घेत नाही आहे. रोज पुण्यातील अनेक परिसरात गावगुंडांनी धुमाकूळ माजवला आहे. त्यामुळे अनेक परिसरात भीतीचं वातावारण निर्माण झालं आहे. मात्र आता नवनियुक्त आयुक्तांनी या गुन्हेगारीला रोखण्यासाठी नवनवे उपक्रम सुरु केले आहेत त्यांनी थेट या अट्टल आणि भुरट्या गुन्हेगारांची परेड काढली आहे आणि गुन्हेगारांना सज्जड दमदेखील दिला आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Crime News : ही Last worning आहे! गुन्हेगारीचे रिल्स अन् स्टेटस टाकलं तर याद राखा; पोलीस उपायुक्तांकडून गुन्हेगारांना सज्जड दम