Pune Crime News : 14 एप्रिल रोजी दोन गटांत (Pune Crime News) झालेल्या वादातून (BJP) भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक विवेक यादव (Vivek Yadav) यांच्यासह आठ ते दहा जणांवर गोंधळ घातल्याप्रकरणी (Crime News) लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये विवेक यादव (वय 40, रा. वानवडी), त्याचा भाऊ संतोष यादव, लुल्लानगर, सागर वैर्या (20), पंकज जगताप (3,5, रा. कुंभारबावडी, कॅम्प), सुशील यादव (35) आणि शिवाजी यांचा समावेश आहे. या घटनेबाबत अमित नारायण मोरे (वय 28, रा. कॅम्प) यांनी फिर्याद दिली.
नेमकं काय घडलं?
14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कॅम्प परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. अमित मोरे या मिरवणुकीत सहभागी होऊन बाटा चौकात आले असता रात्री 11.30 च्या सुमारास संतोष यादव, सागर वैर्या आणि त्यांच्या साथीदारांनी मोरे यांच्या मित्रावर हल्ला केला. मोरे आणि त्यांचे मित्र फिर्याद देण्यासाठी लष्कर पोलीस ठाण्यात गेले, तिथे माजी नगरसेवक विवेक यादव त्यांच्या साथीदारांसह पोहोचले. मोरे यांच्या तक्रारीनुसार, यादवने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून तक्रार मागे घेण्यास सांगितले.
पोलिसांच्या कामात अडथळा आणला...
विवेक यादव यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (MOCCA) गुन्हा दाखल आहे. तो सध्या जामिनावर बाहेर आहे. शुक्रवारी रात्री यादवने लष्कर पोलीस ठाण्याच्या आवारात एका व्यक्तीला मारहाण केली. सरकारी ड्युटी पार पाडण्यास सरकारी सेवकाला अडथळा केल्याप्रकरणी त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त (झोन 2) स्मार्तना पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे पोलीस ठाण्यात पोहोचले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शीतल जाधव तपास करत आहेत.
पुण्यातील गुन्हे कधी थांबणार?
पुण्यात सातत्याने गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे. रोज पुण्यात नवे गुन्हे समोर येत आहेत. चोरी, खून, महिलांवरील अत्याचार, लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. शिवाय कोयता गँग, चुहा गँगचीही दहशत पाहायला मिळते. अशातच आता हडपसरमधून ही हादरवणारी घटना समोर आली आहे. त्यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर उभं राहिलं आहे. ही गुन्हेगारी कधी थांबणार किंवा या गुन्हेगारीला आळा कधी बसणार, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.