Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत. त्यामुळं त्यांनी एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) शिवसेनेत यावं असे आमंत्रण शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि उपनेते माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी दिलं आहे. अजित पवारांनी अस्वस्थेतूनच पहाटेची शपथ घेतली होती. हे संपूर्ण देशाला आणि राज्याला माहिती असल्याचे शिवतारे म्हणाले.
अजित पवार हे चुकीच्या पक्षात
अजित पवार हे थोतांड माणूस नाहीत. कोणीतरी सांगितलं म्हणून गेले आणि परत आले यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही. कारण तिकडे जे चाललं होतं ते ठीक नव्हते म्हणून ते तिकडे गेले होते असे शिवतारे म्हणाले. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, तर शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे. अजित पवार भाजपमध्ये येणार हे कोणाला आवडणार नाही , असे म्हणत शिवतारेंनी थेट अजित पवारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत यावं असे खुले आमंत्रण शिवतारे यांनी इंदापुरातील पत्रकार परिषदेत दिलं. अजित पवार हे चुकीच्या पक्षात आहेत. त्यांनी पक्ष सोडायची मी वाट बघत असल्याचे शिवतारे म्हणाले.
अजित दादा काम करणारा माणूस, बाकी सगळी लुटारुंची टोळी
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजित दादा फक्त काम करणारा माणूस आहे, बाकी सगळी लुटारुंची टोळी आहे. अजित पवार हे चुकीच्या पक्षात आहेत. अजित पवार पक्ष सोडायची वाट बघत असल्याचे शिवतारे म्हणाले. विजय शिवतारे हे दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. बारामती तालुक्यातील खांडज येथील दुषीत नीरा नदीची पाहणी केली. तसेच कारखान्याचे दूषित पाणी नदीत सोडले जाते त्या कारखान्याच्या संचालक मंडळ आणि प्रशासनाला शिवतारे यांनी विनंती केली आहे की हे पाणी लवकर थांबवावे. राष्ट्रीय हरित लवादाकडे मला जायला लावू नका असा इशाराही त्यांनी दिला आहे. राष्ट्रवादी ही लुटारूंची टोळी आहे. अजित पवार हे फक्त काम करतात असे कौतुकही शिवतारे यांनी केलं आहे.
अजित पवार जे बोलतील तोच आमदारांचा आकडा
अजित पवार हीच राष्ट्रवादी आहे. त्यामुळं अजित पवार जे बोलतील तोच आमदारांचा आकडा त्यांच्यासोबत असेल असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलं. लग्न व्हायचं असेल तर तिथी ची गरज असते. तो तिथी लवकरच येणार असल्याचं सूचक वक्तव्य पाटील यांनी केलं आहे. ते जळगावमध्ये (Jalgaon) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चांणा उधाण आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: