पुणे : पुण्यातून (Pune) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  एका अल्पवयीन मुलाच्या शरीरात हवा भरण्यासाठी त्याच्या गुदद्वारात एअर कॉम्प्रेसर लावण्यात आल्याचा अघोरी प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फूड प्रोसेसिंग कंपनीत काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलासोबत हा अघोरी प्रकार घडला असून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे फूड प्रोसेसिंग कंपनीत चांगलीत खळबळ उडाली आहे. 


मोतीलाल साहू असे मृलाचं नाव असून तो हडपसर औद्योगिक क्षेत्रातील पूना फ्लोर अँड फूड्स मध्ये कर्मचारी होता. हडपसर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आरोपी धीरजसिंग गोपाळसिंग गौड (21) याला अटक केली. तिसऱ्या मजल्यावरील पूना फ्लोर अँड फूड्स कंपनीच्या आवारात सोमवारी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. मोतीलाल साहू या तरुणाच्या शरिरात एअर कॉम्प्रेसरने हवा भरल्याने त्याच्या पोटाच हवा गेली आणि त्यानंतर गुदमरुन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.  हडपसर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गौडला अटक केली. शंकरदीन साहू यांनी तक्रार दाखल केली आहे.  शंकरदीन साहू, मोतीलाल साहू  आणि धीरजसिंग गोपाळसिंग गौड हे तिघेही एकाच कंपनी काम करत होते. मस्करीत हा सगळा प्रकार सुरु असल्याची माहिती आहे. मात्र अघोरी मस्करी करायच्या नादात एकाचा मृत्यू झाला आहे. 


सुनेचं पाळीचं रक्त विकलं...


काही दिवसांपूर्वी पुण्यातूनच अघोरी प्रकार समोर आला होता. सासरच्यांनी सुनेच्या पाळीचं रक्त योगीतून काढून विकल्याचा प्रकार समोर आला होता. हा आघोरी प्रकार सुनेने थेट पोलिसांनी सांगून पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. घरात मुल बाळ होत नाही म्हणून हा आघोरी प्रकार करण्यात आला होता. हे पाळीचं रक्त सासरच्यांनी योनीतून कापसाच्या साहय्याने काढलं असल्याचं तक्रारीत सुनेने म्हटलं होतं. मासिक पाळी दरम्यान तिचे हातपाय बांधून तिचे मासिक पाळीचे रक्त कापसाने काढत ते भरुन 50 हजार रुपयांना जादूटोण्यासाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. घडलेली घटना या पीडित महिलेने तिच्या आई वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली होती. 


पुण्यात अघोरी प्रकार सुरुच..


पुण्यात मागील काही दिवसांपासून अनेक अघोरी प्रकार सुरुच असल्याचं दिसत आहे. असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र कौटुंबिक हिंसाचारात हे अघोरी प्रकार घडत असल्याच्या घटनांची संख्या मोठी आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Accident : जरांगेंच्या सभेच्या स्वयंसेवकांची यादी घेऊन निघालेल्या युवकाचा अपघातात मृत्यू ; मराठा स्वयंसेवकात शोककळा