नांदेड : जिल्ह्यात झालेल्या एका अपघतात (Accident) 45 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या कंधार येथील सभेसाठी चोंडी तालुक्यातील स्वयंसेवकांची यादी आणि गावातून जमा झालेली देणगी घेऊन हा युवक कंधारकडे निघाला होता. याचवेळी समोरून येणाऱ्या मोटर सायकलची समोरासमोर जोराची धडक झाली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. बालाजी नारायण जाधव (वय 45 वर्ष, रा. चोंडी, ता. लोहा) असे मयत युवकाचे नाव आहे.

Continues below advertisement

अधिक माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांची कंधार येथे 8 डिसेंबर रोजी सभा होत आहे. या सभेसाठी लोहा तालुक्यातील चोंडी या गावातून मराठा समाज बांधवांकडून जमा झालेली देणगी आणि सभेसाठी उपस्थित राहणाऱ्या स्वयंसेवकांची यादी घेऊन बालाजी नारायण जाधव हे कंधार येथे जात होते. दरम्यान, कंधार तालुक्यातील बाळंतवाडी या गावाजवळ आल्यानंतर समोरून येणाऱ्या मोटर सायकलची समोरासमोर जोराची धडक झाली. हा अपघात एवढा मोठा होता की, मोटारसायकलचा चकनाचूर झाला. या भीषण अपघातामध्ये बालाजी नारायण जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर, गुलाब लक्ष्मण गीते (वय 27, रा. नागदरवाडी, ता. लोहा) हा युवक जखमी झाला आहे. गुलाब गीते यास कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

नांदेड जिल्ह्यात जरांगेंच्या पाच सभा...

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्याकडून महाराष्ट्राचा दौरा केला जात आहे. दरम्यान, त्यांच्या याच चौथ्या टप्यातील दौऱ्यात नांदेड जिल्ह्यात एकूण पाच ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या सभा होणार आहेत. ज्यात, नांदेड जिल्ह्यात 6 डिसेंबर माहुर येथे बळीराजा चौक लांजी बायपास रोड येथे दुपारी 12 वाजता भव्य जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. 7 डिसेंबर रोजी बारड येथे नांदेड ते भोकर रस्त्यावर दरक पेट्रोलपंपासमोरील शेतात सभा होईल, तसेच 8 डिसेंबर रोजी जिजाऊ नगर मुसलमानवाडी पाटी येथे मातोश्री कॉलेजच्या मागे कल्हाळ रोडवरील शेतात सकाळी 10 वाजता सभा होईल, मारतळा येथे नांदेड ते हैद्राबाद रोडवरील शेतात दुपारी 1 वाजता, नायगाव येथे हनुमान मंदीराच्या मागे बैलबाजार मैदानात दुपारी 3 वाजता, कंधार येथे शिवाजी हायस्कूलच्या मैदानात पानभोसी रोडवर रात्री 7 वाजता सभा होणार आहेत. विशेष म्हणजे याच सभेसाठी मराठा समाज बांधवांकडून जमा झालेली देणगी आणि सभेसाठी उपस्थित राहणाऱ्या स्वयंसेवकांची यादी घेऊन बालाजी नारायण जाधव हे कंधार येथे निघाले होते, आणि त्यांचा अपघातात मृत्यू झाला. 

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या: 

Cashless Treatment: रस्ते अपघातातील जखमींसाठी आता कॅशलेस उपचार; 4 महिन्यांत सुविधा संपूर्ण देशात होणार लागू