पुणे : पुण्यातील गुन्हेगारांची परेड, ड्रग्स कारवाईनंतर (PUNE CRIME) आता अवैध मद्य विक्रीवर (liquor) पोलिसांची करडी नजर असणार आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची (Pune Rural Police) अवैध व्यावसायावर मोठी छापेमारी केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी शहराजवळच एक दोन हजार नाही तर तब्बल तब्बल 9000 लिटर दारू जप्त केली आहे. उरुळी कांचन येथे पोलिसांची मोठी कारवाई केली आहे.
पुणे शहराजवळ सोरतापवाडी जवळ पोलीसांनी हातभट्टीवर मोठा छापा टाकला. या छाप्यात जवळपास नऊ हजार लिटर हातभट्टी दारू जप्त केली. सोरतापवाडी भागात 2 ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. एका कारवाईत पोलिसांनी जप्त केली 525 लिटर दारू तर दुसऱ्या कारवाईत 9000 लिटर हातभट्टी दारूचे कंटेनर जप्त केले आहेत. पोलिसांनी याच ठिकाणी छापेमारी करत दारू तयार करण्यासाठी लागणारे 5000 लिटर रसायन जप्त केले आहेत.
धडक कारवाया सुरुच!
ड्रग्स कारवाई नंतर आता पोलिसांनी अवैध मद्य विक्रीवर पोलिसांची करडी नजर असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागीय भरारी पथकाने जिल्ह्यात सहा गावात छापे टाकत 995 लीटर गावठी हातभट्टी दारूसह 7 लाख 90 हजार 550 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. भरारी पथकाने13 फेब्रुवारी आणि14 फेब्रुवारी या दोन दिवसात सोरतापवाडी, शिंदवणे, गाडामोडी, डाळींब, राजेवाडी आणि आंबळे या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत 5 वारस आणि 3 बेवारस अशा 8 गुन्ह्यांची नोंद करून 995 लिटर गावठी हातभट्टी दारू, 25 हजार लिटर रसायण, 3 दुचाकी वाहने आणि गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे साहित्य, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
गुन्हेगारीविरोधात पुणे पोलिसांनी कंबर कसली!
मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. ही गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. विविध विभागातील भरारी पथकं थेट धडक कारवाई करताना दिसत आहे. गुन्हेगारीला आळा बसावा, यासाठी पुणे पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच अशा प्रकारच्या छापेमारीमुळे गुन्हेगारी आणि अवैध विक्रीला आळा बसेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
इतर महत्वाची बातमी-