पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं

  (Pune Crime News) आहे. त्यात नातं, जिव्हाळा उरला आहे की नाही, असे प्रश्न घडलेल्या घडनांमुळे सातत्त्याने विचारले जात आहे. पुण्यात आपल्या मित्राच्या साहय्याने लेकीनंच आईला संपवल्याची घटना समोर आली आहे. 18 वर्षीय मुलीने कट रचून आईची हत्या केल्याने पुणं हादरलं आहे. त्यातच लेकीनं नेमकं आईला का आणि कसं संपवलं? या मागची कारणं कोणती?, आईच्या मृत्यूची आकस्मिक निधनांची नोंद आणि संपूर्ण विधी पूर्ण झाल्यावर ही बाब कशी समोर आली? यासंदर्भात पोलिसांनी हादरवून टाकणारा घटनाक्रम सांगितला आहे.


मंगल संजय गोखले (वय 45 , राजश्री कॉलनी वडगाव शेरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेची मुलगी योशिता संजय गोखले (वय 18) आणि तिचा मित्र यश मिलिंद शितोळे (वय 18, गणेश नगर वडगाव शेरी) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. 


साधारण दीड वर्षापूर्वी योशिताच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर योशिता आणि तिची आई पुण्यात राहायला आले. योशिता आणि तिचं कुटुंब मुळचं मुंबईचं आहे. मात्र योशिताच्या शिक्षणासाठी दोघी मायलेकी पुण्यात आल्या. वडगाव शेरी परिसरात राहत होत्या. यादरम्यान योशिताच्या शिक्षणासाठी कोणत्याची प्रकारची उणिव जाणवू नये, यासाठी योशिताची आई स्वयंपाकाची कामं करत होती. योशिता एकूलती एक असल्याने तिचा कशाचीही कमी पडू नये म्हणून आई दिवस रात्र झटत होती. मात्र याच दरम्यान योशिता एका मित्राच्या नादाला लागली.
 
मुलीच्या शिक्षणासाठी पुण्यात आली मात्र मुलगी अकरावीतच नापास झाली त्यानंतर तिने अकरावी पास केली आणि डिस्टंन्समध्ये बारावी पास केली. या दोन वर्षात वडगाव शेरी परिसरात राहणाऱ्या  यश मिलिंद शितोळे या मुलाशी ओखळ झाली. त्यांची मैत्री वाढू लागली. त्या दोघांना एकत्र राहणं योग्य वाटायचं आणि फिरण्यासाठी पैसे लागायचे. त्यामुळे योशिता तिच्या आईच्या खात्यातून पैसे काढायची. याच पैशातून दोघं आपली हौस पूर्ण करत होती. साधारण दीड लाख रुपये योशिताने आईच्या खात्यातून पैसे काढल्याचं तपासात पुढे आलं आहे. 


हत्या कशी केली?


योशिताच्या आईने एक दिवस घरात बोलत असताना बॅंकेतील पैशाचा उल्लेख केला. त्यापूर्वी योशिता तिच्या आईच्या बॅंंकेची कामं करायची. मात्र आईने बॅकेंचा उल्लेख केल्याने योशिताला घाम फुटला. दीड लाख रुपये आपण काढले, असं कळताच आई ओरडेल याची योशिताला खात्री होती. त्यानंतर तिने आईलाच मारुन टाकण्याचा निर्णय घेतला. मित्राला घरी बोलवलं आणि हत्येचा कट रचला. त्यानुसार आईच्या डोक्यात मित्राने हातोडा घातला आणि आई चुकून ओरडली तर तिचा आवाज बाहेर येऊ नये म्हणून स्वत:च्याच आईच्या तोंडाला ओढणी बांधली आणि तिचा कायमचा आवाज बंद केला. त्यानंतर बाखरुममध्ये नेऊन ठेवलं आणि घरसून पडल्याचा बनाव रचला. 


जखम पाहताच पोलिसांचा संशय बळावला अन्...


त्यानंतर मृत्यूची बातमी कळताच नातेवाईक आले. योशिताची परिस्थिती पाहून नातेवाईकांना तिची किव आली. आईचे अंत्यसंस्कार केले. आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. मात्र ज्यावेळी संपूर्ण प्रकाराची बाकराईनं पाहणी झाली. त्यावेळी पोलिसांना भलताच संशय आला. आई घसरुन पडल्याने नाही तर आईसोबतच काहीतरी झालं आहे, असं संशय आला. त्यामुळे बंद झालेली चौकशी पोलिसांनी पुन्हा सुरु केली. यादरम्यान योशिता आणि बाकी कुटुंबियांची चौकशी केली. त्यावेळी काही समोर आलं नाही. मात्र संशय कायम होता. पोलिसांनी थेट योशिताला बोलवून तिची चौकशी केली. तिचा तू काही केलं आहे का?, असे अनेक प्रश्न  विचारले मात्र त्यावेळी योशिताच्या कुटुंबियांनी योशिता असं काही करणार नाही, याची खात्री पोलिसांना दिली. 


 मामाचा एक प्रश्न अन् योशिताने दिली कबुली...


यादरम्यान योशिताला तिचे मामा मुंबईला घेऊन गेले. त्यावेळी पोलिसांनी घरच्यांना योशिताकडे लक्ष ठेवण्यासाठी सांगितलं होतं. तिच्याकडे विचारपूस करा, असं सांगितलं होतं. मात्र तिची परिस्थिती पाहता कुटुंबियांनी दोन तीन दिवस काहीही विचारलं नाही अखेर तिच्या मामाने योशिताला काही प्रश्न विचारले. आई पडली तेव्हा तूला जाग आली नाही का? हा प्रश्न विचारताच योशिताला घाम फुटला. तिने मामा समोरचं आईला मारल्याचं सांगितलं. मामाने थेट ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पुन्हा योशिताची चौकशी केली. त्यावेळी योशिताने कट रचून आईला मारल्याची कबुली दिली. या प्रकरणी योशिता आणि तिचा मित्र यशला पोलिसांनी अटक केली आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Vasant More On Jitendra Awhad : मी मुरलीची मुरली की आव्हाडांची पुंगी वाजवतो लवकरच कळेल; वसंत मोरेंचा जितेंद्र आव्हाडांना सणसणीत टोला!