Pune Crime News: पुणे जिल्ह्यातील एका फार्महाऊसमधील कर्मचारी क्वार्टरमध्ये राहणाऱ्या 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.  त्याच परिसरात राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. तरुण मुलीच्या कुटुंबाशी संबंधित होता. कायम संपर्कात असायचा, अशी माहिती आहे. 


मुलीचे आईवडील शेतमजूर आहेत. त्यामुळे ते दुपारी घरी नसतात. याची माहिती तरुणाला होती. याचाच फायदा घेत या तरुणानी मुलीवर लैंगिक अत्याचार केला.  ही मुलगी स्थानिक शाळेची विद्यार्थिनी आहे.  शेतमजूर असलेल्या पीडितेच्या वडिलांनी 8 सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता. त्यांच्या एफआयआरनुसार ही घटना 1 सप्टेंबर रोजी दुपारी घडली जेव्हा त्यांची मुलगी घरी एकटी होती. संशयिताला रोजी अटक करण्यात आली होती आणि त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे शहरापासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेले हे फार्महाऊस एका राजकीय नेत्याच्या मालकीचे आहे. 


या प्रकरणातील संशयित हा त्याच फार्महाऊसच्या आवारात कर्मचारी क्वार्टरमध्ये राहणाऱ्या दुसऱ्या शेतमजुराचा मुलगा आहे. 1 सप्टेंबर रोजी दुपारी मुलगी घरी एकटी असताना संशयिताने तिच्यावर बलात्कार केला. नंतर तिने कोणाला सांगितल्यास तिच्या कुटुंबीयांना इजा करण्याची धमकी दिली होती. कुटुंब पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर महिला कर्मचार्‍यांच्या टीमने मुलीशी बोलले आणि तिला आवश्यक वैद्यकीय सहाय्य आणि मानसिक समुपदेशनही केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 


लैंगिक अत्याचाराचं सत्र संपेनाच!


पुण्यात सध्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरणं सातत्याने वाढत आहे. दर महिन्याला किमान चार अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत. शाळेतील समूपदेशनातून या प्रकारच्या घटना वारंवार समोर येत आहे. देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचं सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. काही दिवसांपुर्वी पुण्यातील कोंढवा परिसरातून सर्वांना हादरून टाकणारी घटना उघडकीस आली होती. या परिसरातील एका 35 वर्षाच्या व्यक्तीनं दहा वर्षाच्या मुलीला खेळण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले होते.