पुणे: पुण्याची ओळख आता ड्रग्जचे (Pune Crime News) शहर म्हणून होताना दिसत आहे. ललित पाटील प्रकरणानंतर आणि पबमध्ये ड्रग्जचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. तर शहरात अनेकदा मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडत आहेत. तर तस्करीचे किती मोठे रॅकेट असेल, याचा अंदाज यावरून बांधला जाऊ शकतो. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात मोठी ड्रग्ज रॅकेट्स (Pune Crime News) समोर येत आहेत. काही दिवसांपुर्वी विश्रांतवाडी परिसरात एमडी ड्रग्जचा साठा पुणे पोलिसांकडून (Pune Crime News) जप्त करण्यात आला आहे. या ड्रग्जचे बाजार मूल्य एक कोटीपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे. साधारण अर्धा किलो एमडी डॅक्सचा साठा पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. यादरम्यान तरुणाई अंमली पदार्थांच सेवन करण्यासाठी चक्क कुरीयरचा वापर करत असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. 


पुण्यातील तरुणाई अंमली पदार्थांच सेवन करण्यासाठी चक्क कुरीयरचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील तब्बल 119 तरुणांनी कुरीयर कंपनीच्या मार्फत घरी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ मागवल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. पोलीसांनी आता या 119 जणांच्या पत्त्यांवर संपर्क करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत पोलीसांना 70 जणांचा पत्ता शोधण्यात यश आलं आहे. त्यानंतर पोलिसांकडून या तरुणांच्या पालकांना याची माहिती दिली जाणार असून समुपदेशनाला सुरुवात करण्यात येणार आहे ‌


काय आहे नेमकं प्रकरण?


पुण्यातील 119 तरुणांनी कुरीयर कंपनीच्या माध्यमातून मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ मागवल्याचं पोलीसांना आढळून आलं आहे. डार्क वेबच्या उपयोग करून ऑनलाईन ऑर्डर देऊन हे मेफेड्रॉन मागवण्यात येत होतं. मेफेड्रॉन मागवणाऱ्यांमध्ये 25 ते 40 वयोगटातील तरुणांचा सर्वाधिक समावेश आहे. मेफेड्रॉन मागवणाऱ्यांमध्ये काही विद्यार्थी तर काही नोकरदार आणि आयटीसेक्टरमध्ये काम करणारे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


मेफेड्रॉन मागवताना दुसऱ्याच वस्तूच्या नावाने ऑर्डर दिली जात होती. दोन ते तीन ग्रॅम मेफेड्रॉन त्या वस्तुच्या पॅकींग मध्ये दडवून दिले जात होतं. तरुणांच्या घरातल्यांना, पालकांना या कुरीयरमधे मेफेड्रॉन येत असल्याची कल्पना नव्हती. 119 पैकी 70 जणांचे पत्ते शोधण्यात यश आलं असून या तरुणांच्या कुटुंबीयांना त्याची माहिती पोलीसांकडून दिली जाणार असून त्या तरुणांचं समूपदेशन करण्यात येणार आहे.


पुण्यात तब्बल कोटीचं अमली पदार्थ जप्त


विश्रांतवाडी परिसरात एमडी ड्रग्जचा साठा पुणे पोलिसांकडून (Pune Crime News) जप्त करण्यात आला. या ड्रग्जचे बाजार मूल्य एक कोटीपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे. साधारण अर्धा किलो एमडी डॅक्सचा साठा पोलिसांकडून जप्त करण्यात आला. 


पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून हे एक कोटीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी 3 तरुणांना (Pune Police) अटक केली. त्यांच्या ताब्यातून एक कोटी रुपयाचे 471 ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.