पुणे: पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांना पोलिसांचा (Pune Police) धाक कमी झाला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुण्यात कारागृहातून मोकाच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यानंतर आरोपींनी मोठी रॅली काढली. येरवडा पोलिस (Yerwada Police) ठाण्याच्या हद्दीमध्ये गाड्यांची तोडफोड आणि दहशत माजवल्याप्रकरणात प्रफुल्ल ऊर्फ गुड्या कसबे टोळीवरती मोक्काची कारवाई करण्यात आली होती. नुकताच हा कसबे बुधवारी सायंकाळी येरवडा कारागृहातून जामिनावरती बाहेर आला. मात्र त्याने बाहेर येताच आपल्या दहशतीचा पॅटर्न कायम ठेवत पोलिसांच्या मोठ्या संख्येने गाड्या आपले साथीदार यांच्यासह परिसरात रॅली काढली. एक प्रकारे त्याने पोलिसांना (Yerwada Police) आव्हान देत त्याच्यासोबत असलेल्या टोळक्याने 'मर्डर करायचाय मर्डर' असं म्हणत दहशत माजवली. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर गुन्हेगारांची रॅली काढण्याची हिम्मत होते, तर हे नक्कीच स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा कारवाई करत रॅली काढणाऱ्या आरोपींना येरवडा पोलिसांकडून (Yerwada Police) अटक केली आहे. 


रॅली काढणाऱ्या आरोपींना येरवडा पोलिसांकडून अटक करून त्यांची धिंड काढण्यात आली आहे. येरवडा कारागृहातून आरोपीने मोक्काच्या गुन्ह्यातून जामिनावरती बाहेर येताच गुन्हेगाराची चारचाकी आणि दुचाकीवरून रॅली काढली होती. या प्रकरणाने खळबळ माजली, पोलिसांच्या कामावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले, या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या रॅली काढणाऱ्या गुन्हेगारासह त्याच्या तब्बल  35 ते 40 साथीदारांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रफुल्ल ऊर्फ गुड्या कसबे (रा. लक्ष्मीनगर, येरवडा), दीपक मदने, करण सोनवणे, अनिकेत कसबे, अंश पुंडे, अजय कसबे, सागर कसबे, अभिजीत ढवळे, राहुल रसाळ, नन्या कांबळे, रोशन पाटील, तुषार पेठे व इतर 35 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी त्या भागातील आहेत म्हणून त्याच भागात त्यांची धिंड काढली आहे


दरम्यान, या रॅलीचा हा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रफुल्ल ऊर्फ गुड्या कसबे (रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे), दीपक मदने, करण सोनवणे, अनिकेत कसबे, अंश पुंडे, अजय कसबे, सागर कसबे, अभिजित ढवळे, राहुल रसाळ, नन्या कांबळे, रोशन पाटील, तुषार पेठे यांच्याह 35 ते 40 जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई लहू गडमवाड यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


प्रफुल्ल कसबे हा मंगळवारी (दि.7) जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी रात्री दहाच्या सुमारास त्याच्या समर्थकांनी त्यांच्याकडील चारचाकी गाड्या व 20 ते 30 दुचाकी गाड्यांवरून रॅली काढली. ही रॅली विनापरवानगी काढून गाड्या बेदरकारपणे चालवून आरडाओरडा करून तसेच घोषणाबाजी करून परिसरात दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर कसबे याच्यासह सुमारे 50 हून अधिक जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दहशतीचा नवा पॅटर्न? 


येरवडा कारागृहातून बाहेर पडल्यानंतर गुन्हेगारांच्या रॅली काढणे, त्यांच्या स्वागतासाठी अनेकांनी एकत्र जमणे हे नवीन नाही. मात्र मागील काही महिन्यांमध्ये पोलिस हे सर्व प्रकार कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामध्ये ते यशश्वी ठरले होते. मात्र, पुन्हा नव्याने हा दहशतीचा पॅटर्न सुरू होत असल्याचे दिसून येते आहे. चार वर्षांपूर्वी तळोजा कारागृहातून बाहेर पडलेल्या गुंड गजा मारणे याच्या रॅलीनंतर शहरातील गुन्हेगारी ढवळून निघाली होती. मात्र, आता छोट्या मोठ्या गुन्हेगारांच्या अशा रॅली निघणं पोलिसांची डोकेदुखी ठरू शकते.