Pune :  पुण्यात गर्भपात करताना तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रियकराने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. दरम्यान, आपल्या आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे तिच्या चिमुकल्यांना लक्षात आले. त्यानंतर प्रियकराने प्रेयसीच्या दोन चिमुकल्यांना निर्दयीपणे इंद्रायणी नदी पात्रात फेकून दिले. यामध्ये आईचा गर्भपातामुळे मृत्यू झालाच पण प्रियकराने तिच्या दोन चिमुकल्यांचाही जीव घेतलाय. दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तरुणीच्या आईसह नातेवाईकांनी हंबरडा फोडलाय. आम्हाला न्याय पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 


दया मया दाखवली नाही, चिमुकल्यांना इंद्रायणीत फेकून दिलं 


अधिकची माहिती अशी की, गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी 6 जुलै रोजी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. गर्भवती प्रेयसीला आणि तिच्या 5 आणि 2 वर्षीय मुलाला घेऊन प्रियकर गजेंद्र दगडखैर कळंबोली 6 जुलै रोजी येथे गेला. अमर रुग्णालयात प्रेयसीचा गर्भपात करण्यात आला, मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं प्रेयसीचा 8 जुलै रोजी मृत्यू झाला. त्यानंतर गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेने मध्यस्थी करत मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गाईकवाडच्या सोबतीनं मावळमध्ये आणला आणि गजेंद्र आणि रविकांतने 9 जुलैच्या अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला. नंतर प्रेयसीची दोन्ही मुलं रडू लागली. आता या दोघांमुळं आपलं बिंग फुटेल, या भीतीने निर्दयीपणाचा कळस गाठला. कोणतीही दया-मया न दाखवता त्या दोन्ही मुलांना ही त्याच नदीच्या प्रवाहात जीवंत फेकून दिलं.


पोलिसांनी अनेकदा कसून चौकशी केली, मात्र दोघांकडून उडवाउडवीची उत्तरं


दुसऱ्या दिवसांपासून हे दोघे ही काही घडलंच नाही, असं वावरू लागले. दरम्यानच्या काळात प्रेयसीसोबत तिच्या कुटुंबियांचा संपर्क होत नसल्यानं, तिच्या कुटुंबीयांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत तिघे हरवल्याची तक्रार दिली. मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. प्रेयसीला गजेंद्रने अनेकदा फोनवरून संपर्क साधल्याचं आणि गजेंद्रने मित्र रविकांतशी त्याच दरम्यान फोनवर अनेकदा बोलल्याचं तपासात समोर आलं. या दोघांची पोलिसांनी अनेकदा कसून चौकशी केली, मात्र दोघे ही उडवाउडवीची उत्तरे देत होती. शेवटी पोलिसी खाक्या दाखवण्यात आला अन् दोघांनी घडला प्रकार कबूल केला. तळेगाव पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाई सुरू आहे.




इतर महत्वाच्या बातम्या 


Pune Crime : गर्भपात करताना प्रेयसीचा मृत्यू, मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रेयसीच्या दोन्ही चिमुकल्यांनाही इंद्रायणीच्या प्रवाहात जीवंत फेकलं, पुणे हादरलं!