Pune Crime News : पुणे शहराच्या (Pune City) विविध भागातील बंद घरांवर पाळत ठेवून घरफोड्या करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला (Criminal Arrested) गुन्हे शाखेच्या (Pune Crime Unit) युनीट सहाच्या पथकाने बुधवारी अटक केली आहे. आरोपीकडून आत्तापर्यंत घरफोडीच्या 30 घटना उघडकीस आल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, एका वाहनासह तब्बल 31 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


पुणे शहरातील लोणी काळभोर परिसरात सातत्याने होणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेच्या युनीट सहाच्या पथकाकडून सुरू होता. या सर्व घरफोड्यांच्या गुन्ह्यांमध्ये सराईत गुन्हेगार अर्जुनसिंग दुधानी याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून सर्व घरफोड्या केल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या युनीट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी त्यांच्या संपूर्ण पथकासह मिळून आरोपी अर्जुनसिंग दुधानी याचा तपास सुरु केला. त्याच्या ठिकाणाबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून आरोपी दुधानी याला अटक देखील केली. ज्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली, तेव्हा त्याने शहराच्या अनेक भागात घरफोडीचे तब्बल 30 गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली. ज्यानंतर आता पुढील कारवाई पोलीस करत आहेत. 



हे ही वाचा-



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live