पिंपरी-चिंचवड : प्लॅस्टिक मुक्त शहर करण्यासाठी सर्व पालिकांप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकाही (Pimpri Chinchwad) बरेच प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून "प्लॅस्टिक बॉटल द्या, चहा-वडापाव खा" हा एक अनोखा उपक्रम राबवण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. या उपक्रमाअंतर्गत काही ठरावीक ठिकाणच्या वडापावविक्रेत्यांकडे प्लॅस्टीकच्या बॉटल दिल्यास चहा आणि वडापाव मोफत खाण्यास ग्राहकांना मिळणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पालिकेने वृत्तपत्रात जाहिरात देत वडापाव विक्रेत्यांना उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 


या उपक्रमातंर्गत विक्रेत्यांना चहा आणि वडापावची रक्कम पिंपरी चिंचवड महापालिका अदा करणार आहे. त्यामुळे एका अर्थाने ग्राहकांना चहा आणि वडापाव अगदी मोफत मिळणार आहे. या उपक्रमात सहभागी होणारे विक्रेते आणि ग्राहक आपोआपच प्लॅस्टिक मुक्तीला हातभार देखील लावणार आहेत. यासाठी महापालिकेने वृत्तपत्रात एक जाहिरात छापली असून, चहा आणि वडापाव विक्रेत्यांना या अभिनव उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन केलं आहे. विक्रेत्यांकडून नोंदणी होताच हा उपक्रम प्रत्यक्षात राबविला जाणार आहे. यासाठी ग्राहकांनी विक्रेत्यांना 5 प्लॅस्टिक बॉटल दिल्यानंतर एक कप चहा आणि 10 प्लॅस्टिक बॉटल दिल्यावर एक वडापाव मिळणार आहे. या बॉटल विक्रेत्यांनी महापालिकेला सुपूर्त करायच्या आहेत. त्या मोबदल्यात महापालिका विक्रेत्यांना एक कप चहासाठी 10 रुपये आणि एक वडापावचे 15 रुपये अदा करणार आहे.  


हे ही वाचा- 



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live