Pune Crime : पुण्यातील हडपसर परिसरात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. फुरसुंगी येथील मेडिकलच्या दुकानात घुसून दुकानदाराला चाकूने हातावर, डोक्यावर सपासप वार करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. जखमीला तात्काळ नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोलिसांनी धाव येऊन घटनेची माहिती घेतली. ही घटना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी खंडोबा माळ येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज सुदाम आडागळे ( वय ४० खंडोबा माळ फुरसुंगी ) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जखमी शिवश्री मेडिकलचे मालक वैभव तुकाराम मखरे ( वय 26 ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी खंडोबा माळ येथे फिर्यादी मखरे यांचे शिवश्री मेडिकल आहे. त्यांच्या गल्ली समोरच मनोज आढागळे हे राहतात. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास, मनोज आढागळे हे मेडिकलमध्ये आले आणि 'उधारी वरती औषध गोळ्या द्या' अशी मागणी केली. यावेळी वैभव मखरे यांनी आम्ही उधारी वरती औषधे देत नाही असे सांगितले. त्यावेळी आढागळे याने वैभवला शिवीगाळ केली, शाब्दिक वाद वाढत मनोज अडागळे याने मारहाण करत दुकानात घुसून दुकानाची तोडफोड करून भाजी कापणाऱ्या चाकूने वैभव वरती सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात वैभव पडल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेऊन त्याला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी धाव घेऊन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
इंदापुरात 3 पिस्टल जप्त; पोलिसांची फ्लॅटवर धाड, दरोडेखोरास अटक
वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट झाल्या असून इंदापूरमध्ये (Indapur) दरम्यान दोन दिवसांपूर्वी एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. दरोड्याची योजना आखणाऱ्या एका दरोडेखोरोला इंदापूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यावेळी, त्याच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिसांनी (Police) दरोडेखोराकडून 9 सुतळी बॉम्ब (Bomb), 3 पिस्टलसह अन्य शस्त्र हस्तगत केले आहेत. सुयश ऊर्फ तात्या सोमनाथ असं आरोपीचं नांव आहे. याप्रकरणी आता वालचंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून आरोपीकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Video : शिंदेंच्या आमदाराच्या सुरक्षा रक्षकाची एकाला रॉडने बेदम मारहाण, ठाकरे गटाकडून व्हिडीओ व्हायरल