Pune Crime: पुणे (Pune) पोलीस विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. यात एका महिलेसह चार जणांना गांजाची (drug) तस्करी केल्याप्रकरणी अटक (arrest)  केली आहे. उरळीकांचन आणि लोणीकाळभोर परिसरात 8.5 लाख रुपये किमतीचा 43 किलो गांजा आणि 20 लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली आहे.


पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर व त्यांचे पथक उरळी कांचन परिसरात गस्त घालत होते. तेव्हा कोणीतरी गांजा विकायला येत असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी त्यांनी इतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. या टोळीला जेरबंद करण्यासाठी पोलीस पथकाने सापळा रचला. या पथकाने यशस्वीरित्या सापळा रचून गाडी अडवली. दिनेश सोपान काळे (वय 31) याला ताब्यात घेतले. वाहनातून 4 लाख 18 हजार रुपये किमतीचा 20 किलो 750 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण तपास करत आहेत.


लोणी काळभोर परिसरात कारवाई करण्यात आली. गांजा विक्री करणाऱ्या महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. ओंकार पाडुरंग गुरव  (वय 22), अमोल हनुमंत पवार (वय 27) आणि सुरेखा प्रशांत पवार (वय 40) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 4 लाख 31 हजार रुपये किमतीचा 22 किलो गांजा जप्त करण्यात आला.


यापुर्वी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शहरातील भारती विद्यापीठ आणि सिंहगड रोड परिसरात मोठी कारवाई केली होती. पोलिसांनी तीन गांजा तस्करांना अटक केली होती. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शहरातील भारती विद्यापीठ आणि सिंहगड रोड परिसरात छापा टाकून तीन गांजा तस्करांना अटक केली होती. त्यांच्याकडून 23 किलो गांजा, एक मोबाईल, रोख रक्कम आणि 4.5 लाख रुपये किंमतीचा इलेक्ट्रिक काटा जप्त करण्यात आला होता. ते प्रामुख्याने कॉलेज कॅम्पसमध्ये गांजा विकत होते. पोलिसांच्या तपासात वसतिगृहात राहणारे काही विद्यार्थी त्यांचे ग्राहक असल्याचे निष्पन्न झाले होते.