Pune Covid Cases: महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार पुण्यातील साप्ताहिक कोविड-19 अहवालात संसर्गाचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या आठवड्यातील कोविड अहवालात,  23 ते 29 मेपर्यंत 357 रुग्णसंख्या होती. तर या आठवड्यात हा आकडा 538 वर पोहोचला आहे. राज्य मंत्रिमंडळात सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबई, पुणे आणि ठाण्यात आली आहेत.


महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी


गेल्या आठवड्यात 68% नवीन कोरोनाचे रुग्ण फक्त मुंबईतून आले असून त्यापैकी 17 टक्के ठाणे आणि 7.42 टक्के पुण्यातील आहेत. राज्यात 23-29 मे या कालावधीत सक्रिय कोविड रुग्णांची संख्या 3,142 होती, जी 30 मे ते 5 जून या कालावधीत वाढली. रुग्णसंख्या 7,253 झाली आहे. मुंबईत 5 जूनपर्यंत कोरोनाचे 4,880 सक्रिय रुग्ण आहेत, त्यानंतर ठाण्यात 960 आणि पुण्यात 501 सक्रिय रुग्ण आहेत. 5 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात 5,888 कोरोना रुग्णांपैकी 4.3 टक्के रूग्णालयात दाखल आहेत. गंभीर लक्षणे असलेले 61 रुग्ण असून 46 रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. महाराष्ट्राचा कोरोना पॉझिटिव्ह दर 4.7 टक्के आहे तर मुंबईने आधीच 8.82 टक्के कोविड  आहे. पुण्याचा कोविड पॉसिटीव्हीटी रेट 4.39 आहे.


केरळनंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे


10 लाख लोकसंख्येमागे सर्वाधिक कोरोनाच्या बाबतीत केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात 246 सक्रिय रुग्ण आहेत, तर महाराष्ट्रात हा आकडा 53 आहे. सहा जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढल्याने अधिकाऱ्यांना तात्काळ चाचण्या करण्यास सांगण्यात आले आहे,  महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.


नवीन रुग्णांची संख्या वाढली


रोज 25,000-30,000 चाचण्या घेतल्या जात आहेत.पीएमसी आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ.आशिष भारती यांनी कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास पुरेशी तयारी करण्यासाठी सांगितले आहे.पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये किमान 800 ते 900 बेड आहेत. शहरात दररोज 1,000-1200 चाचण्या घेतल्या जात आहेत कारण नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे, असं भारती यांनी सांगितले.