पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या (Vaishnavi Hagawane Death) प्रकरणातील संशयित आरोपी तिचे सासरे राजेंद्र हगवणे हे या प्रकरणानंतर काही दिवस फरार होते. तेव्हा त्यांना मदत केलेल्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. राजेंद्र हगवणेला (Rajendra Hagawane) मदत करणाऱ्या या पाच जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) याला आसरा देणाऱ्या पाच जणांना पुणे न्यायालयाने काल (मंगळवारी) न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यामध्ये माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील (कर्नाटक) यांचा मुलगा प्रीतम पाटील, मावळ मधील फार्म हाऊस मालक बंडू फाटक, साताऱ्यातील पुसे गाव येथील राहुल जाधव,अमोल जाधव,तळेगांव दाभाडे येथील मोहन भेगडे यांच्या यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे न्यायालयाने पोलिस कोठडीची मागणी फेटाळत न्यायालयीन कोठडी दिली होती. या सर्वांचा आता 25 हजार रुपयांच्या जातमुचालक्यावर जामीन झाला आहे
पुसेगाव येथील राहुल जाधव आणि अमोल जाधव यांना जामीन मंजूर
या दरम्यान त्यांनी पुणे सातारा कर्नाटक भागामध्ये वास्तव्य केले असल्याची माहिती समोर आल्यानंतर साताऱ्यातील पुसेगाव या ठिकाणचे राहुल जाधव आणि अमोल जाधव यांना अटक करण्यात आली होती. यावेळी त्यांना पुणे न्यायालयासमोर हजर केले असता. पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याची माहिती त्यांचे वकील अँड. श्रीकांत पन्हाळे यांनी दिली आहे. पुसेगावच्या राहुल जाधव आणि अमोल जाधव यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी केली होती.
या प्रकरणांमध्ये जे आरोप केले होते ते हार्बरिंग ऑफ क्रिमिनल अनुषंगाने असल्यामुळे हा जामीन पात्र गुन्हा आहे यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्यामुळे आणि त्यांच्यावर कोणताही पुरावा, आरोप नसल्यामुळे त्यांना जामीन मिळावा, असा युक्तिवाद न्यायालयासमोर मांडल्यामुळे हा जामीन मंजूर झाला आहे. पोलिसांच्या तपासामध्ये पुसेगाव येथील राहुल जाधव आणि अमोल जाधव यांनी फरार असणाऱ्या संशयित राजेंद्र हगवणे यांना आश्रय दिला असल्याची माहिती होती. मात्र प्राथमिक दृष्ट्या तरी त्यांचा या प्रकरणाशी संबंध दिसून येत नाही.
ते पाच जण कोण?
या प्रकरणात कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम वीरकुमार पाटील (वय 47, रा. कोगनोळी, ता. निपाणी, बेळगाव, कर्नाटक) याच्यासह मोहन ऊर्फ बंडू उत्तमराव भेगडे (वय 59, रा. भेगडे वस्ती, वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (वय 55, रा. भांगरवाडी, लोणावळा), अमोल विजय जाधव (वय 35) व राहुल दशरथ जाधव (वय 45, दोघे रा. पुसेगाव, ता. खटाव, सातारा) यांना पोलिसांनी काल (सोमवारी) रात्री अटक केली होती. त्यांना आज (मंगळवारी) दुपारी शिवाजीनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
अटक करण्यात आलेल्या आरोपींचे राजेंद्र हगवणेशी आधीपासून मित्रत्वाचे संबंध असून, त्यांनी वैष्णवीच्या मृत्यूनंतर पळून गेलेल्या राजेंद्र व सुशीलला राहण्यासाठी जागा दिली होती. त्याचबरोबर गाड्या पुरवल्या होत्या, एकमेकांचे मोबाइल दिले होते. या गुन्ह्यात त्यांचा सहभाग आहे का? त्यांनी हगवणेना आर्थिक मदत केली का, याबाबत तपास करायचा आहे, त्यामुळे तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी केली होती, मात्र पुणे न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करून दिला आहे.
हगवणे कुटुंबियांची पोलीस कोठडी आज संपणार
वैष्णवीच्या प्रकरणात आज हगवणे कुटुंबियांची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळं पती, सासू, नणंद असं तिघांना या अन सासरा आणि दिर असं दोघांना स्वतंत्ररित्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. याच प्रक्रियेसाठी हगवणे कुटुंबाला पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलंय, दुपारी अडीचच्या सुमारास पुणे सत्र न्यायालयात पुढची सुनावणी होणार आहे. न्यायालय या पाच ही आरोपींच्या पोलीस कोठडीत की न्यायालय कोठडीत रवानगी करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.